शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
5
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
6
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
7
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
8
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
9
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
10
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
11
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
12
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
13
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...
14
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
15
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
16
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
17
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
18
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
19
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
20
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

साऊथ अफ्रिका,ओमान देशातून आलेले नागरिक काेराेना पाॅझिटिव्ह; रायगडमध्ये चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 16:34 IST

माणगाव आणि खारघर येथे सापडले दोन रुग्ण; राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले नमुने

- आविष्कार देसाई 

रायगड- जिल्ह्यात साऊथ अफ्रिका आणि ओमान देशातून आलेल्या दोन प्रवाशांना काेराेनाची लागण झाल्याचे तपासणीत समाेर आले आहे. माणगाव आणि खारघर या ठिकाणी हे दाेन्ही रुग्ण वास्तव्यास आहेत. त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच त्यांना आेमायक्राॅनची लागण झाली आहे का हे स्पष्ट हाेणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात आेमायक्राॅन हातपाय पसरणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे.

आेमायक्राॅनचा पहिला रुग्ण साऊथ अफ्रिकेत सापडला हाेता. त्यानंतर आेमायक्रानचा जगभर वेगाने प्रसार झाला आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ३३३९ नागरिक परदेशातून आले आहेत.(रायगड ग्रामिणमध्ये १६०४ आणि पनवेल महपालिका हद्दीत १५३५) परदेशातून आलेल्या २५१९ नागरिक ट्रेस करण्यात आले आहे. (रायगड ग्रामिणमध्ये १३५२ आणि पनवेल महपालिका हद्दीत ११९७)परदेशातून आलेल्या १८७९ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ९०८ रायगड ग्रामिणमधील तर ९७१ पनवेल महापालिका हद्दीतील आहेत. पैकी रायगड ग्रामिणमध्ये माणगाव तालुक्यात एक आणि पनवेल महापालिका हद्दीतील खारघर येथे एक अशा दाेन नागरिकांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्याती चिंता वाढली आहे.

रायगड ग्रामिण भागातील माणगाव येथे आेमान राष्ट्रातून महिला आली आहे. तीचे वय २५ वर्ष आहे. तीच्या साेबत अन्य दाेन व्यक्ती हाेत्या. या महिलेने फायझर कंपनीचे दाेन्ही डाेस घेतले आहेत. पहिला डोस १९ जुन २१ तर दुसरा डोस ८ आॅगस्ट २१ रोजी घेतला आहे. सदरची महिला पाच महिन्यांची गराेदर आहे. सात दिवसांनंतर तीची आरटीपीसीआर टेस्ट केल्यावर ती काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर आले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील खारघर येथे आलेली व्यक्ती हा पुरुष आहे. त्यांचे वय ४८ आहे. साऊथ अफ्रिका नंतर युके असा प्रवास करत भारतात आला आहे. त्यांनीही काेव्हिशिल्डचे दाेन्ही डाेस पूर्ण केलेले आहेत.

पहिला डोस ६ एप्रिल २१ तर दुसरा डोस १८ जुलै २१ रोजी घेतला होता. त्याची सात दिवसांनतर आरटीपीसीआर तपासणी केल्यावर काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे उघड झाले आहे. दाेघांचेही नुमने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच आेमायाक्राॅनची लागण झाली आहे का हे स्पष्ट हाेणार आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या २० जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आलेला नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

दरम्यान, परदेशातून आलेल्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी क्रिसमस, थर्टीफस्ट डिसेंबरचे सेलिब्रेशन जरा जपूनच करावे, मास्क, सामाजिक अंतर, सॅनेटाईजरचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगड