शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साईकोंड येथे उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:00 IST

वस्तुसंग्रहालयासाठी ग्रामस्थांचा प्रयत्न । बाराव्या शतकातील शिल्प असल्याचा अंदाज

गिरीश गोरेगावकर 

माणगाव : तालुक्यातील साई गावजवळील साईकोंड येथील एका लहानशा टेकडीवर साधे कौलारू पद्धतीचे शिवमंदिर होते. त्याची खूप पडझड झाली होती. तेथे दर्शनासाठी शिवभक्त जात होते. तेथेच शिवमंदिराजवळ वीरगळ व सतीशिळेसारखे अवशेष होते. नुकतेच या शिवमंदिराचा साईकोंड गावातील ग्रामस्थ व शिवभक्तांनी जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. या जीर्णोद्धारासाठी इमारतीच्या बांधकामासाठी खड्डे खणण्यास सुरुवात केली. त्या वेळी अनेक प्राचीन शिल्प अढळून आले. हे अवशेष बाराव्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज कोकणातील इतिहास आणि संस्कृती यावर अभ्यास करणारे डॉ. अजय धनावडे यांनी व्यक्त केला.

साईकोंड येथील ग्रामस्थांनी त्वरित संपर्क साधून डॉ. अजय धनावडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर डॉ. अजय धनावडे हे आपल्या विशेष पथकासह शिवमंदिर साईकोंड येथे आले. सुमारे १५ दिवस त्यांनी उत्खननाचे काम सुरू ठेवले. त्यानंतर प्राचीन मंदिराचे एक एक अवशेष बाहेर काढण्यात आले. हे अवशेष बाराव्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज धनावडे यांनी व्यक्त केला.साई हे गाव माणगावच्या पश्चिमेस सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. या अवशेषांमध्ये रेखीव कलात्मक मकरप्रणाल, काही सुस्थितीतील असलेले तर काही भग्नावस्थेतील वीरगळ, सतीशिळा, द्वारशाखा, उंबऱ्याचे अवशेष, खांबांचे तळखडे, भग्नावस्थेत असलेले तरी ठसठशीतपणे उठून दिसणारे गजलक्ष्मी शिल्प, सिद्धवीरांच्या प्रतिमा, नंदी, मराठा काळातील गणेश मूर्ती, पालीयाचे स्मृती दगड असे एक नाही अनेक प्राचीन वास्तू अवशेष सापडले. त्यावरून येथे एक प्राचीन मंदिर उभे होते, असा त्यांनी निष्कर्ष काढला.शिलाहार काळात या परिसरात शैव, वैष्णव, शाक्त पंथाचा चांगलाच प्रभाव होता. हे दाखवणारे अनेक पुरावे या परिसरात उपलब्ध झाले आहेत. येथील स्तंभांच्या तळखड्यावर असलेली नृसिंह, महिषासुरमर्दिनी यांची शिल्पे याचीच प्रतीके आहेत. आढळलेले गजलक्ष्मी शिल्प हे समृद्धी व सुबत्तेचे प्रतीक मानावे लागेल. वीरगळ म्हणजे हा प्रदेश ताब्यात ठेवण्यासाठी, येथील गोधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ उभारला गेलेला स्तंभ होय. शेती आणि गवताळ कुरणे यांनी कृषीसंपन्न तसेच फळफळावळ, झाडेझुडपे तसेच निसर्गरम्य व असलेला हा परिसर दहाव्या शतकानंतर व्यापारामुळे भरभराटीला आला होता. हे ठिकाण समुद्री सपाटीपासून५०० मीटर अंतरावर आहे.‘शिल्पांचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करा’1इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांनी येथील ग्रामस्थांना या पुरातन अवशेषांचे महत्त्व समजावून सांगितले आणि येथे असलेल्या अवशेषांची हेळसांड होऊ नये तसेच आपला हा वारसा पुढील पिढ्यांसाठी टिकून राहवा म्हणून या मूर्ती-शिल्पांचे एका वस्तुसंग्रहालयात रूपांतर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.2शिवमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थांनी स्वयंभू श्री शंकर मंदिर ट्रस्ट साईकोंड या नावाने एक धर्मादाय संस्था निर्माण केली असून, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना मंदिराजवळच एक दालन उभारून त्यात हे अवशेष संग्रहालय रूपाने जपून ठेवण्याचा निश्चय केला आहे. साईकोंड येथील गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करून दानशूर व इतिहासप्रेमी लोकांनी या संस्थेस उदार हस्ते मदत करावी, असे आवाहन केले आहे.काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या बहिशल विभागाकडून तेथूनच जवळ असलेल्या चांदोरे येथे झालेल्या उत्खननात आढळलेल्या पुरातन अवशेषावरून ही बाब जास्तच स्पष्ट झाली आहे. पूर्वीपासूनच परदेशाशी समुद्रमार्गे सुरू असलेला व्यापार शिलाहार काळातदेखील सुरू होता. त्यामुळेच श्रीवर्धन या बंदरावरून लिंगा किंवा देवघाटाने पठारी प्रदेशात जाणाºया व्यापारीमार्गावर साई हे गाव असल्याने साईगावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असावे.- डॉ. अजय धनावडे, इतिहासआणि संस्कृती अभ्यासकच्साई हे गाव दिघी माणगाव पुणे या महामार्गावर असून, साईकोंड हे केवळ १ किमी अंतरावर वसलेले एक छोटेसे खेडे आहे. शासनाने या प्राचीन अवशेषांची दखल घेऊन त्यांचे संग्रहालय उभारण्यासाठी आर्थिक निधी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.च्ही मागणी पूर्ण झाल्यास या परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊन या भागात रोजगारनिर्मिती होईल. या मतदारसंघाच्या आ. आदिती तटकरे या पर्यटन खात्याच्या राज्यमंत्री असल्याने त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड