शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करणाऱ्यांची रेखाचित्रे जारी

By admin | Updated: February 21, 2016 02:47 IST

कर्जत तालुक्यातील गोळीबार प्रकरणी गुन्ह्याचा तपास लागावा म्हणून रायगड पोलीस आणि ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. दरोडेखोरांना पाहणाऱ्या जखमी आकाश धुळे यांच्या पत्नी

नेरळ : कर्जत तालुक्यातील गोळीबार प्रकरणी गुन्ह्याचा तपास लागावा म्हणून रायगड पोलीस आणि ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. दरोडेखोरांना पाहणाऱ्या जखमी आकाश धुळे यांच्या पत्नी स्वाती यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्या दोन्ही दरोडेखोरांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. मात्र या गोळीबार प्रकरणाचा तपास रायगड पोलीस प्रमुख सुवेज हक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला आहे.श्वानपथकाच्या माध्यमातून काही सुगावा लागतो काय, यासाठी श्वान नेरळ येथे आणण्यात आला आहे. गोळीबार प्रकरणाचा लवकर छडा लावला जावा यासाठी अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालय येथून श्वान आणण्यात आला होता. दुपारी घटनास्थळी कोदिवले येथे श्वानपथकाला फिरविण्यात आले. त्याने दरोडेखोरांनी प्रवेश केलेल्या घराची तसेच हाताचा स्पर्श केलेल्या वस्तू यांना हुंगून काही सुगावा लागतो का, याची माहिती करून घेतली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी दोन चित्रकारांच्या मदतीने स्वाती आकाश धुळे यांच्या खाणाखुणा आणि सांगण्यावरून त्या दोन्ही दरोडेखोर यांची रेखाचित्रे तयार केली आहेत. दोन्ही दरोडेखोर यांची रेखाचित्रे ठाणे आनिव रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी यांच्याकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हा अधीक्षक शालिग्राम पाटील यांनी दिली.सर्वांनी ग्रामीण भागात पाळत ठेवण्यास सुरु वात केली असून, संशयित दुचाकीस्वार यांची चौकशी सर्व ठिकाणी राज्य मार्ग तसेच महामार्ग या ठिकाणी सुरू आहे. मात्र तरीही कोणताही सुगावा लागत नसल्याने रायगड जिल्ह्याचे पोलीसप्रमुख सुवेज हक यांनी या गोळीबार प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला आहे.