शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने रेशन दुकानदार हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:23 IST

ई-पास मशीनचा शिधापत्रिकाधारकांना होतोय त्रास

n  लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : शासनाने गरजू नागरिकांना दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य ई-पास मशीनद्वारे रास्त भाव धान्य दुकानातून धान्याचे वितरण करण्यात येत असते. सलग दोन दिवस कमी प्रमाणात इंटरनेट मिळत असल्याने एका शिधापत्रिकाधारकाला मशीनवर बोटाचे ठसे घेण्यास पंधरा मिनिटे लागत आहेत. यामुळे धान्य वितरण करण्यात अडचण येत आहे. रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी आलेल्या शिधापत्रिकाधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांमध्ये ई-पास मशीन लावण्यात आल्या आहेत. यात मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. परंतु रास्तभाव धान्य दुकानांमधील ई-पास मशीनकरिता नेटवर्क पुरेसे मिळत नसल्याने वारंवार शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात अडथळा निर्माण होत आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ई-पास मशीनला इंटरनेट सेवा मिळत नसल्याने अनेक शिधापत्रिकाधारकांना रेशन घेण्यास उशीर होत आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील बहुतांश दुकानांमध्ये आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांच्या बोटाचे ठसे ई-पास मशीनवर उमटत नाहीत.   

उमटत नाहीत बोटाचे ठसेशासनाकडून ऑनलाइन धान्य वितरणाची राबविण्यात येत असलेली योजना शिधापत्रिकाधारकांच्या फायद्याची असली तरी ई-पास मशीनवर उमटत नसलेले बोटाचे ठसे आणि वारंवार इंटरनेट सेवा मिळत नसल्याने रेशनमालकाबरोबर शिधापत्रिकाधारकांना त्रास सहन लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगड