शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटात आढळले दुर्मीळ खवले मांजर

By admin | Updated: October 24, 2016 02:40 IST

वन्य प्राण्यांची भटकंती सध्या अन्नाच्या शोधात दूरवर होवू लागली आहे. पोटाची भूक शमविण्यासाठी आता ते लोकवस्तीमध्ये बेधडक घुसत आहेत.

पेण : वन्य प्राण्यांची भटकंती सध्या अन्नाच्या शोधात दूरवर होवू लागली आहे. पोटाची भूक शमविण्यासाठी आता ते लोकवस्तीमध्ये बेधडक घुसत आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे, अजगर यापाठोपाठ दुर्मीळ खवले मांजराचा प्रवासही गाव खेडे परिसरात सुरू झाला आहे. सध्या शिवारात भात कापणी सुरू असून शेताच्या बांधावरील उंच गवताच्या आड भक्ष्य शोधण्यासाठी दुर्मीळ खवले मांजर वाशी ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी गावाबाहेरील घराच्या परिसरात आढळून आले. मासे पकडण्याच्या जाळ्यांनी या मांजरास जेरबंद करून वनखात्यास पाचारण करण्यात आले. ही दुर्मीळ प्रजाती वनपालाच्या स्वाधीन करण्यात आली. एक थरारक क्षण म्हणून या घटनेची वाच्चता होवून वाशी ग्रामस्थांनी खवले मांजर पाहण्यासाठी एकच गर्दी केली. गावकरी धनाजी ठाकूर यांच्या घराशेजारील रस्त्यावर हे मांजर आढळले. त्यांनी या प्रजातीस ओळखून इतर गावकऱ्यांच्या सहाय्याने पकडले. शेजारील पावळ किंवा धामणी वनातून हे मांजर खारफुटी जंगलाकडे भक्ष्याच्या शोधात आले असावे असा अंदाज आहे. सायंकाळच्या वेळी दिवे लागणीच्या सुमारास वाशी गावाकडे आले.वनविभाग पेणचे परिक्षेत्र वन अधिकारी एस. आर. पवार, परिमंडल अधिकारी पी. के. म्हात्रे त्यांचे सहकारी पोईलकर यांनी तातडीने घटनास्थळी जावून ते खवले मांजर ताब्यात घेतले. अन्य सहकाऱ्यांच्या सहाय्याने या मांजरास भक्ष्याची अनुकूलता असलेल्या जंगल परिक्षेत्रात शनिवारी रात्री ९.३० वाजता सोडण्यात आले. ८ किलो वजन, १ मीटर लांब असे हे दुर्मीळ खवले मांजर रात्रीच्या अंधारात जंगलात वेगाने लुप्त झाले आणि हे थरारक नाट्य संपले. (वार्ताहर)