शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्येही पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 03:29 IST

बुधवारी दुपारी सुरू झालेल्या वादळी पावसाचा कहर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मागील २४ तासांत सुमारे २१७ मिमी पावसाची नोंद पनवेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.

पनवेल : पनवेलमध्ये बुधवारी दुपारी सुरू झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत सुमारे ६०० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली आहेत. तर १०० पेक्षा जास्त वाहनांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे एका महिन्यापूर्वी आलेल्या निसर्ग वादळापेक्षाही जास्त तीव्रता या वादळी पावसाची असल्याने या वेळी विशेषत: शहरी भागात मोठे नुकसान झाले आहे.1बुधवारी दुपारी सुरू झालेल्या वादळी पावसाचा कहर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मागील २४ तासांत सुमारे २१७ मिमी पावसाची नोंद पनवेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्याने कळंबोली, पनवेल शहरातील वीजपुरवठा सुमारे १० तासांपेक्षा जास्त काळ खंडित झाला होता. वादळी वाऱ्यामुळे महावितरणलादेखील वीजपुरवठा सुरळीत करण्यास अडथळा येत असल्याने अनेक भागातील नागरिकांना संपूर्ण रात्रच अंधारात काढावी लागली. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल शहर, तळोजा आदींसह ग्रामीण भागात या वादळी वाºयाचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात इमारतींच्या छतावरील पत्रे वादळामुळे या वेळी उडाल्याचे पाहावयास मिळाले.2गुरुवारी तुटलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. या वेळी ठिकठिकाणी उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम पालिका, सिडको तसेच नागरिकांच्या माध्यमातून सुरू होते. रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्यासाठी पालिकेमार्फत ९ पथके तयार करण्यात आल्याची माहिती उपायुक्त तेजस्विनी गलांडे यांनी दिले. वादळाची तीव्रता मोठी असल्याने प्राथमिक अंदाजावरून ६०० झाडे उन्मळून पडल्याची माहिती गलांडे यांनी दिली. यासंदर्भात सर्व्हे सुरू असून, दोन दिवसांत ही माहिती समोर येईल, असे गलांडे यांनी सांगितले. दरम्यान, या वादळी पावसाची कोणतीच सूचना हवामान खात्याच्या माध्यमातून दिली गेली नसल्याने वाहनांचेही नुकसान झाले आहे.प्राथमिक अंदाजात १०० पेक्षा जास्त वाहनांचे नुकसान झाले आहे.3या वादळी पावसात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. यासंदर्भात पंचनामा सुरू असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी दिली.निसर्ग वादळापेक्षा जास्त नुकसान या वेळी पनवेलमध्ये झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकीकडे कोरोनाची वाढती साथ त्यातच चक्रीवादळ यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पनवेल तालुक्यातील अनेक भागात मागील २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजवाहिन्या तसेच विजेच्या खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणमार्फत परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. 

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल