शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमधील व्यापारी संकुलाच्या कामाला गती

By admin | Updated: November 16, 2016 04:41 IST

रायगड जिल्हा परिषद बांधत असलेले पहिले व्यापारी संकुल नेरळमध्ये साकारत आहेत. नेरळ विकास प्राधिकरणच्या साडेचार कोटींच्या

कर्जत : रायगड जिल्हा परिषद बांधत असलेले पहिले व्यापारी संकुल नेरळमध्ये साकारत आहेत. नेरळ विकास प्राधिकरणच्या साडेचार कोटींच्या निधीमधून हे व्यापारी संकुल उभे राहत असून चार मजली व्यापारी संकुलात शंभरहून अधिक गाळे आहेत. राज्यातील पहिला प्रयत्न रायगड जिल्हा परिषद करीत असून २०१७च्या सुरुवातीला या संकुलाचे लोकार्पण होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दिली.माथेरान या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाला जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून नेरळची ओळख आहे. नेरळमधील आर्थिक घडीदेखील ५० टक्के माथेरानच्या पर्यटनावर अवलंबून आहे. त्या नेरळ गावातील दाटीवाटीचे रस्ते ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. नेरळमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या जागेवर विकासाच्या दृष्टीने नेरळ विकास प्राधिकरणच्या माध्यमातून बहुमजली व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात बहुमजली स्वरूपाचे कुठेही व्यापारी संकुल नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी चार मजली व्यापारी संकुल बांधण्यासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर करून घेतला. तेथे शंभरहून अधिक गाळे बनवून एका ठिकाणी एक मोठे मार्केट वसवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत आहे. या व्यापारी संकुलाचा फायदा नेरळच्या बाजारपेठेतील वाहतूककोंडी कमी होण्यासाठी होऊ शकतो. तर अनेक गरजवंतांना व्यवसाय मिळू शकतो.जून महिन्यात भूमिपूजन करण्यात आलेल्या नेरळ व्यापारी संकुलाचे बांधकाम तेथे मोठ्या प्रमाणात असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सुरू होऊ शकले नाही. मात्र, पावसाचा जोर कमी होताच नेरळ व्यापारी संकुलाचे काम सुरू झाले आहे. तळमजल्यावर पार्किंग आणि दोन मजल्यांवर व्यापारी गाळे, तर तिसऱ्या मजल्यावर जिल्हा परिषदेचे विश्रामगृह अशी रचना असलेल्या या संकुलाच्या कामाने गती घेतली आहे. व्यापारी संकुलात लोकांना चढ-उतार करण्यासाठी लिफ्टदेखील बसवली जाणार असून राज्यात जिल्हा परिषदेने उभारलेले चार मजली पहिल्या व्यापारी संकुलाचे काम आता जोरात सुरू आहे. लवकरात लवकर व्यापारी संकुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या असल्याची माहिती नेरळ प्राधिकरणचे विशेष उपअभियंता सदानंद शिर्के यांनी दिली. (वार्ताहर)