शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

काराव गटात पक्षांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: February 17, 2017 02:14 IST

पेण तालुक्यातील काराव जिल्हा परिषद गट व काराव पंचायत व शिहू गणात शेकाप, राष्ट्रवादी, भाजपा, मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली

वडखळ : पेण तालुक्यातील काराव जिल्हा परिषद गट व काराव पंचायत व शिहू गणात शेकाप, राष्ट्रवादी, भाजपा, मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काराव गटात शेकाप-राष्ट्रवादी आघाडी आहे तर शिवसेना- काँग्रेस युती आहे. भाजपा स्वतंत्र निवडणुकीत उतरला आहे. काराव गटातून शेकाप- राष्ट्रवादी आघाडीकडून शेकापचे ज्येष्ठ नेते पेण पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती महादेव दिवेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस -शिवसेना युतीकडून काँग्रेसने परशुराम पवार यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपाने लक्ष्मण निरगुडा यांना उमेदवारी दिली आहे. काराव गणातून काँग्रेस-शिवसेना युतीकडून शिवसेनेचे पेण तालुका प्रमुख नरेश गावंड यांना उमेदवारी दिली आहे. तर शेकाप- राष्ट्रवादी आघाडीकडून पेण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष परशुराम मोकल यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने पेण तालुका सचिव मनोहर पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाने युवा कार्यकर्ता विकेश पाटील यांना उभे केले आहे, तर अपक्ष पांडुरंग तांडेल रिंगणात आहेत. शिहू गणातून शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक सुनीता खाडे रिंगणात आहेत, तर शेकापने पेण पं.स.चे माजी सभापती संजय भोईर यांच्या पत्नी मनीषा भोईर यांना उमेदवारी दिली, भाजपाने येथील भाजपाचे नेते हिरामण कोकाटे यांची पत्नी तृप्ती कोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. काराव जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात प्रमुख राजकीय पक्षांनी आपले महत्त्वाचे पदाधिकारी निवडणुकीत उतरविले असल्याने राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (वार्ताहर)