शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

नववर्ष स्वागतासाठी पर्यटक सज्ज

By admin | Updated: December 30, 2016 03:56 IST

नववर्षाच्या स्वागतासाठी नाताळपासूनच पर्यटक मुरुड तालुक्यात येवू लागले आहेत. यामुळे मुरुडमधील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे.

बोर्ली-मांडला : नववर्षाच्या स्वागतासाठी नाताळपासूनच पर्यटक मुरुड तालुक्यात येवू लागले आहेत. यामुळे मुरुडमधील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. गुलाबी थंडी आनंद घेत पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. देशी-विदेशी पर्यटकांनी पर्यटनासाठी रायगड जिल्ह्याला अधिक पसंती दिली असून त्यांची सर्वाधिक पसंती ही मुरुड जंजिऱ्याला असल्याचे दिसून येत आहे. उंच माड, पोफळी, निळसर समुद्र, सुंदर व स्वच्छ सागरी किनारा एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला गडद हिरवाईच्या सान्निध्यात पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. प्रवासी आणि पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवून मुरुड शहरातील काशिद, नांदगाव, बोर्ली, साळाव, बारशिव, चिकणी, विहूर, येसदे आदी ठिकाणच्या हॉटेलचे बुकिंग महिन्यापूर्वीच के ले असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली. साधारणपणे यावेळी दीड ते दोन लाखापर्यंत पर्यटक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्येच पर्यटकांना मुरुडमध्ये पर्यटन महोत्सवाचा आनंद मनमुराद लुटता येणार आहे.यावर्षी दिवाळी हंगामात हॉटेल व्यावसायिकांना अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने विचारपूर्वक दर आकारणी करण्यात आली आहे. मुरुड तालुक्यात दीड हजारापासून तीन हजारापर्यंत रुमची बुकिंग होत आहे. बोर्ली परिसरातील काही हॉटेलमध्ये पाच हजार रुपयात जेवण सुद्धा देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी निव्वळ रुमचे भाडे आकारले जात आहे. पर्यटकांनी येथे येत असताना माहिती व आरक्षण व्यवस्थित केले असल्यास त्यांची गरैसोय होणार नाही, असेही काही हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.मुरुड तालुक्यातील काही हॉटेल रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांसाठी डीजे, रुम आर्केस्ट्रा, टॅटू स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, लावणी आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खाजगी बंगले सुद्धा बुक करण्यात आले आहेत. (वार्ताहर)वाहतूक कोंडीची समस्या : अलिबागकडून येणाऱ्या जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना नागाव, रेवदंडा, चौल येथे वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक पोलीस कर्मचारी तैनात झाले आहेत. पोलीस पथकांनीही सुरक्षेच्या दृष्टीने आणि कु ठलाहीअनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना के ल्या असून चोख पोलीस बंदोबस्त यावेळी असणार आहे.