शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग परिसरात पेपर इंडस्ट्री उभारण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:15 IST

बहुराष्ट्रीय कंपनी : आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

आविष्कार देसार्ई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारी पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे. यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या अथवा देशपातळीवरील कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी आली तरी जिल्ह्याचा विकास होणे महत्त्वाचे आहे, असे मत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मात्र, आधीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, त्यानंतरच नव्याने भूसंपादन करा, असा सूर स्थानिक पातळीवर आळवला जात असल्याने भूसंपादनाच्या प्रक्रियेला विरोध होणार असल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये एमआयडीसीमार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सुमारे एक हजार ३०० एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या परिसरामध्ये नेमका कोणता उद्योग उभारण्यात येणार आहे. याची माहिती स्थानिकांसह शेतकऱ्यांना नाही. प्रकल्प कोणता येणार आहे याचीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांनी जमिनी कशा काय द्यायच्या, असा सवाल येथील ग्रामस्थ परशुराम म्हात्रे यांनी केला आहे. एमआयडीसीने याआधीच टाटा पॉवर प्रकल्पासाठी सुमारे एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन केले आहे. प्रकल्प येण्याआधी प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रकल्पच झाला नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पार धुळीला मिळाल्या आहेत. त्यामुळे आधी प्रकल्पग्रस्तांना दिलेली लेखी आश्वासने पूर्ण करा, त्यानंतरच नवीन संपादनास सुरुवात करा, अन्यथा भाजपकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये १०२ एकर परिसरामध्ये शेततलावांची निर्मिती केली आहे. त्या शेततळ्यांवर स्थानिकांचा रोजगार अवलंबून असल्याने सरकारने हा १०२ एकरमधील शेततळ्यांचा परिसर वगळून अन्य ठिकाणी कोणताही पर्यावरण पोषक प्रकल्प आणावा. त्याला आमचा विरोध नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या सुट्टीवर असल्याचे सांगितले.जिल्ह्याच्या विकासासाठी होणार?च्जिल्ह्याच्या विकासासाठी अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरामध्ये तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार आहे.च्याआधी रायगडमधील शिवसेनेचे तत्कालीन खासदार अनंत गीते यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत प्रत्येकी तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेपर इंडस्ट्री उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.च्पुढे त्यांची ही घोषणा हवेतच विरली होती. आता नवनिर्वाचित खासदांरानी अलिबागमध्ये पेपर इंडस्ट्री उभारण्याचे जाहीर केल्याने या ठिकाणी खरेच उद्योग उभा राहणार का? हा खरा प्रश्न आहे.इंडोनेशियन कंपनी असल्याची चर्चाच्अलिबाग तालुक्यामध्ये इंडोनेशियन कंपनी आपले हात-पाय रोवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी शहापूर-धेरंड परिसरामध्ये एका बड्या गुंतवणूकदाराने भेट दिल्याचे बोलले जाते. दिल्लीमधूनच या ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानेच या गुंतवणूकदारासोबत वरिष्ठ प्रशासकीय आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी उपस्थित होते, अशीही चर्चा आहे.