शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कुक्कुटपालकांनी बर्ड फ्लूबाबत काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन; अफवांवर विश्वास ठेवून भीती बाळगू नका

अलिबाग : सध्या बर्ड फ्लूबाबतची भीती सर्वत्र पसरलेली दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष्यांमधील बर्ड फ्लू या आजाराविषयीची योग्य ती माहिती समजून घेऊन त्याप्रमाणे काळजी घ्यावी, भीती बाळगू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. पक्ष्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात मर्तृक आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना त्वरित कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के आणि जिल्हा पशुविकास अधिकारी डॉ. बंकट आर्ले यांनी नागरिकांना केले आहे.

पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचा इतर जंगली पक्ष्यांशी (उदा. बदके, कबुतर, पोपट, चिमण्या, कावळे इ.) संपर्क होणार नाही, याची दक्षता घेणे व जैवसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे, कुक्कुटपालकांनी शेड व परिसरामध्ये स्वच्छता बाळगणे, नियमित सोडियम हायपोक्लोराइड, धुण्याचा सोडा, चुना लावून परिसर निर्जंतुकीकरण करणे. प्रादुर्भाव झालेल्या फार्मवरून पक्ष्यांची वाहतूक, खरेदी-विक्री थांबवावी, असे सांगितले.

जिल्हा, विभागीय नियंत्रण कक्षाला कळवा

n पक्ष्यांच्या स्रावांसोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्याचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते, अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला कळवा. 

n कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. पूर्ण शिजवलेले मांसच खा. आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील, तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजीचिकन व अंडी १०० अंश डि.से.वर शिजवूनच खावीत, चिकन स्वच्छ करताना हॅण्ड ग्लोव्हजचा वापर करावा, समाजमाध्यमांतून व इतर प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अफवांपासून सावध राहावे. मांस, अंडी व मासे चांगले शिजवून बिनधास्त खा व निरोगी राहा तसेच अधिक माहितीसाठी www.ahd.maharahstra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

हे करू नका कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका. अर्धवट शिजलेले मांस खाऊ नका. आजारी दिसणाऱ्या सुस्त पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नका. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका, असेही आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग