शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वादाला पोलीसच जबाबदार

By admin | Updated: December 4, 2015 00:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरुन नियमितपणे घडणाऱ्या हाणामारीच्या घटनांना पोलीसयंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना

महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरुन नियमितपणे घडणाऱ्या हाणामारीच्या घटनांना पोलीसयंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना आ. भरत गोगावले यांनी गुरु वारी पत्रकार परिषदेत केला. महाविद्यालयात हाणामारी करणाऱ्यांवर पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई केली असती तर या घटना टाळता आल्या असत्या. मात्र घटना पोलिसांनी गांभिर्याने घेतल्या नाहीत. याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात, अशी मागणी देखील आ. गोगावले यांनी यावेळी केली. आ. गोगावले म्हणाले की, या वादावर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी हस्तक्षेप करुन त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी आ. गोगावले यांनी यावेळी केली. यासाठी कुलगुरुंची आपण शुक्रवारी भेट घेणार असल्याचेही गोगावले यांनी स्पष्ट केले. वेळ पडल्यास याप्रकरणी आपण विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर) पोलिसांवर खोटा आरोपबुधवारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कर्मचाऱ्यांच्यामध्ये झालेल्या वादात विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप खोटा असल्याचा खुलासा डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांनी केला आहे. आवश्यक तेंव्हा वेळो वेळी पोलिसांनी योग्य करवाई केली आहे. पोलिसांवर केला जाणारा आरोप खोटा आहे, असे स्पष्टीकरण सोनावणे यांनी केले.अ‍ॅट्रॉसिटीप्रकरणी गुरव यांना अटकडॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. धनाजी गुरव व लिपिक रमेश पाटील यांना अ‍ॅट्रॉसिटीप्रकरणी बुधवारी रात्री अटक करण्यात आली. ९ नोव्हेंबरला माजी प्राचार्या आरती वानखेडे यांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणाची चौकशी करुन या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली.