शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पालघर पालिकेकडून नागरिकांची लूट

By admin | Updated: December 30, 2016 04:14 IST

या नगरपरिषदेने पालघरवासीयांकडून पाणीपट्टीची नावावर अव्वाच्यासव्वा वसूली करून त्यांची लूटच चालवली आहे. नळधारकांना प्रत्यक्ष पाण्याच्या वापरा पेक्षा

पालघर : या नगरपरिषदेने पालघरवासीयांकडून पाणीपट्टीची नावावर अव्वाच्यासव्वा वसूली करून त्यांची लूटच चालवली आहे. नळधारकांना प्रत्यक्ष पाण्याच्या वापरा पेक्षा जादा रक्कमेची सरासरी बिले बजावून त्यांची वसूली होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.पालघर शहरात ग्रामपंचायत काळा पासूनच पाइपलाइन गटारा लगतच टाकण्यात आली असून बहुतांशी दूषित पाण्याचा पुरवठा होत असतो. तर शहरातील अनेक नळजोडण्या या बेकायदेशीरपणे सुरु असल्याने अधिकृत नळजोडणीधारकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नगरपरिषदेच्या बैठकीत होत आहेत. पालघर टेंभोडे रस्त्यावरील हार्मनि रेसिडेंन्शिल समोर राहणाऱ्या शशिकला हरेश्वर दारुवाले यांना नोव्हेंबर महिन्याचे पाणीपट्टीचे १६० युनिट १८६० रुपयांचे बिल पाठविण्यात आले.मात्र अभय दारुवाले यांनी आपले बिल आणि मीटर मधील रिडींग यांची तपासणी केली असता ४५ युनिट जास्त लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्ष नळजोडणी धारकाकडे न जाता सरासरी बिले माथी मारली जात असल्याचे दारुवाले यांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे ह्यांच्याशी संपर्क साधला असता चुकीची बिले आली असल्यास ती दुरु स्त केली जातील असे सांगितले.