शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

'खेळाडूंनी दडपण न घेता दर्जेदार खेळ खेळावा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:47 IST

नंदिनी बोंगाडे यांचे मार्गदर्शन; राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा सुरू

अलिबाग : प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे तशी क्र ीडा क्षेत्रातही आहे. खेळाडूंनी स्पर्धेचे दडपण न घेता त्यांचा मूळ खेळ खेळून दर्जेदार कौशल्याचे प्रदर्शन सातत्यपूर्ण प्रयत्न व कठोर परिश्रम घेऊन करावे, असे मार्गदर्शन हॅण्डबॉल खेळातील शिवछत्रपती क्र ीडा पुरस्कार प्राप्त आणि जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या डॉ. नंदिनी बोंगाडे यांनी गुरुवारी येथे केले.क्र ीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्र ीडा परिषदेच्या वतीने जिल्हा क्र ीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन बोंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संघटक सूर्यकांत ठाकूर, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे महासचिव सुरेश बोंगाडे, जिल्हा क्र ीडा अधिकारी महादेव कसगावडे, सौगत दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होणारबोंगाडे म्हणाल्या, या स्पर्धेमधून राज्याचा संघ निवडण्यात येणार असून चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होणार आहेत. त्यामुळे खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी.स्पर्धेत अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे व कोल्हापूर अशा एकूण आठ विभागातून ५०० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. प्रारंभी डॉ. नंदिनी बोंगाडे यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला.सूर्यकांत ठाकूर यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. रायगड जिल्ह्याची गतवर्षाची राष्ट्रीय पदकविजेती श्रावणी जाधव हिने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्र माचे प्रास्ताविक जिल्हा क्र ीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड