शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरमध्ये शेकापचा लाल बावटा

By admin | Updated: January 12, 2016 00:53 IST

नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागा जिंकून शेकापक्षाने दणदणीत यश संपादन केले आहे. खालापूरमध्ये शेकापक्ष व शिवसेनेमध्ये कडवी लढत होईल, अशी अपेक्षा असताना

खालापूर : नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागा जिंकून शेकापक्षाने दणदणीत यश संपादन केले आहे. खालापूरमध्ये शेकापक्ष व शिवसेनेमध्ये कडवी लढत होईल, अशी अपेक्षा असताना तालुका चिटणीस संतोष जंगम यांच्या नेतृत्वाखाली शेकापने एकहाती सत्ता संपादन करीत शिवसेनेला मोठा झटका दिला. शिवसेनेला खालापूरमध्ये अवघ्या पाच जागा मिळाल्या असून, शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सेनेचे जिल्ह्यातील सर्व नेते खालापूरमध्ये प्रचारात उतरले होते. मात्र संतोष जंगम यांनी संयमी प्रचार करून विजय खेचून आणला. राष्ट्रवादीला खालापूरमध्ये २ जागा मिळाल्या असून, भाजपा व मनसेला मात्र मतदारांनी नाकारले आहे.खालापूर नगरपंचायतीच्या १७ जागांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शिवसेना व शेकापमध्ये दुरंगी सामना अपेक्षित असताना शेकापने जोरदार मुसंडी मारीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत केले. शेकापच्या प्रचाराची सर्व धुरा तालुका चिटणीस संतोष जंगम यांच्या खांद्यावर होती. १७ पैकी १५ जागा लढवत शेकापने १० जागांवर विजय संपादन केला. या विजयाचे खरे शिल्पकार संतोष जंगम ठरले आहेत. जंगम यांच्या पत्नी शिवानी जंगम वार्ड क्र मांक १३ मधून विजयी झाल्या असून, खालापूर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. शिवसेनेने खालापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जिल्हाप्रमुख दिनेश पाटील व उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी प्रचाराची सर्व सूत्रं आपल्या हातात ठेवली होती. खालापूरकरांनी शिवसेनेला नाकारल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे. मतदारांनी मात्र शिवसेनेला नाकारले असून, १७ जागा लढविलेल्या शिवसेनेच्या पदरात केवळ पाच जागांचे दान पडले आहे.खालापूर बाजारपेठेत तर शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली असून, ८ जागा लढवत दोन जागांवर यश मिळविले आहे. भाजपा व मनसेला खालापूरमध्ये खातेही खोलता आलेले नाही. गुलाब वाघमारे, शारदा गायकवाड, दिलीप पवार, रेणुका पवार, दीपक नाईक, संध्या मगर, शिवानी जंगम, मंगला चाळके, ममता चौधरी व राहुल चव्हाण हे शेकापचे १० उमेदवार विजयी झाले आहेत. तर धनंजय गावंड, बाळकृष्ण पाटील, अवधुत भुर्के, सुरेखा पवार, दिलीप मणेर हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या संगीता पवार आणि कांचन गव्हाणकर यांनाही मतदारांनी नगरसेवक केले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.