शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सुक्या कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक निर्मिती; कर्जत नगर परिषदेच्या प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:49 IST

कर्जत शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, हा कचरा घनकचरा प्रकल्पावर जातो, यापैकी ओला कचरा बायोगॅससाठी वापरून त्याद्वारे पथदिव्यांसाठी वीज निर्मिती केली जाते.

कर्जत : कर्जत नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील गोळा केलेल्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, रबर आणि तोडफोड केलेल्या इमारतीच्या डेंब्रिजपासून पेव्हर ब्लॉक बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

कर्जत शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, हा कचरा घनकचरा प्रकल्पावर जातो, यापैकी ओला कचरा बायोगॅससाठी वापरून त्याद्वारे पथदिव्यांसाठी वीज निर्मिती केली जाते. मात्र, सुक्‍या कचऱ्यामधील प्लास्टिक बाटल्या, रबर, रॅपर, गाडीचे टायर, चपला आदी तसेच तोडफोड केलेल्या इमारतींच्या डेंब्रिजचे सिमेंटमिश्रित वाळू यांचे करायचे काय, असा प्रश्न नगर परिषदेला नेहमी सतावत होता. जरी हा कचरा कोणी विकत घ्यायला आला तरी तो खरेदीदार फारच अल्प किंमत देत असे. त्यामुळे नगर परिषदेला काही विशेष फायदा होत नसे आणि या वाढत जाणाऱ्या कचऱ्यामुळे जागा अडत असे त्यावर उपाय म्हणून आता ह्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक तसेच रबर यावर विशिष्ट प्रक्रिया करून घनकचरा प्रकल्प परिसरात एका शेडमध्ये गृवाला कन्स्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी यातून पेव्हर ब्लॉकची निर्मिती करणार आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका संचिता पाटील, प्राची डेरवणकर, विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, भारती पालकर, वैशाली मोरे नगरसेवक राहुल डाळिंबकर आदी उपस्थित होते.

प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भागात हे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत, त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. यापुढे तयार करण्यात येणारे पेव्हर ब्लॉक शहरात जिथे गरज आहे तिथे बसविण्यात येतील. पेव्हर ब्लॉक बनविण्यासाठी येणारा सर्व खर्च गृवाला कन्स्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करणार असून, त्यातील उत्पन्नातील काही टक्के उत्पन्न संबंधित कंपनी नगर परिषदेला देणार आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डम्पिंग ग्राऊंडमधील वाढत्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट या माध्यमातून आपोआप लावली जाईल.

डेंब्रिज आणि प्लास्टिक तसेच रबरपासून पेव्हर ब्लॉकची निर्मिती केल्याने या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या दूर झाली आहे. नगर परिषद ओडीएफ प्लस सर्टिफिकेट मिळवण्यात यशस्वी झाली आहे तसेच स्वच्छ भारत अभियान ऑल इंडिया रँकमध्ये येण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी