शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ उर्दू शाळेला पालकांनी ठोकले टाळे

By admin | Updated: February 21, 2016 02:47 IST

तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ येथील उर्दू शाळेत आठ शिक्षकांची पदे मंजूर असूनही गेल्या अनेक वर्षांपासून चार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी

कर्जत : तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ येथील उर्दू शाळेत आठ शिक्षकांची पदे मंजूर असूनही गेल्या अनेक वर्षांपासून चार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक एका पदवीधर शिक्षिकेची बदली पनवेल येथे करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकले असून शाळा बेमूदत बंद, असा फलक लावून उपोषणाचा इशारा दिला आहे.नेरळ येथे रायगड जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची उर्दू शाळा असून, २०३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक वर्षांपासून येथे आठ शिक्षकांऐवजी चारच शिक्षक कार्यरत आहेत. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युसूफ हनीफ सय्यद गेल्या दोन वर्षांपासून उपसंचालक शिक्षण विभाग मुंबई, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी, शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कर्जत यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीच करवाई झाली नाही. २३ डिसेंबर २०१५ ला कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षिकांची अचानकपणे पनवेल येथे बदली केली आहे. त्यामुळे येथे चार शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीने २७ जानेवारीस पालक सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. शाळेला शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत नेरळ उर्दू शाळेत मुलांना पाठविणार नाहीत, असा निर्णय पालकांनी घेतला आहे. (वार्ताहर)कर्जत तालुक्यात नऊ उर्दू शाळा असून, आठ शाळांतील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांचे समायोजन न झाल्याने सर्व शाळेत उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथील पदे रिक्त आहेत. - सुरेश डंबाये, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती कर्जत