शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये ३९ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: October 28, 2016 03:41 IST

पेण शहराचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास हा अजेंडा मतदानासमोर ठेवीत विकासाच्या संकल्पनेतून पेण शहराची निवडणूक रंगतदार ठरणार अशी प्रारंभीची चिन्हे

पेण : पेण शहराचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास हा अजेंडा मतदानासमोर ठेवीत विकासाच्या संकल्पनेतून पेण शहराची निवडणूक रंगतदार ठरणार अशी प्रारंभीची चिन्हे दिसत आहेत. पेण नगर परिषदेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी काँग्रेस पक्षातर्फे विद्यमान नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पक्षाचा ए बी फॉर्मसहित नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. पेण शहर विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यामुळे ही लढत रंगतदार ठरणार असून दोन्ही गटाकडून एकूण ३७ समर्थकांसहित शक्तिप्रदर्शन केले.पेण नगर परिषदेसह रायगडमधील नऊ नगर पालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारांचे सक्षमता, लोकप्रियता, लोकांच्या अडीअडचणींना धावून जाणारा, आर्थिक क्षमता व कार्यकर्त्यांचा संच या निकषावर पेणच्या दोन्ही गटाकडून लक्ष केंद्रीत करून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही गटाकडून अटीतटीचे प्रयत्न सुरू राहणार. उमेदवारांमध्ये दोन्ही गटांकडे विद्यमान नगरसेवकांचाच अधिक भरणा दिसत असून पेण शहराच्या वॉर्डावॉर्डामध्ये असलेले प्रस्थापितांचे मताचे एकगठ्ठा पॅकेटसह, नवमतदारांना खेचण्याचा व गोळाबेरीज करून डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगराध्यक्षांची थेट मतदारांमधून निवड होणार असल्याने मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. येत्या महिनाभरात याबाबत मतदारांचे विचारमंथन होवून ही राजकीय हवा तापत राहणार आहे. गुरु वारी दोन्ही गटाने प्रमुख नेतेमंडळी, शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांसह उमेदवारी अर्ज सादर केले. काँग्रेसतर्फे माजी मंत्री रवींद्र पाटील तर पेण शहर विकास आघाडीतर्फे शेकाप आ. धैर्यशील पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी निवडणूक अधिकारी व पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी शांततेत अर्ज दाखल के ले. (वार्ताहर)