शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पालीमध्ये जुन्या नोटा जप्त

By admin | Updated: May 19, 2017 00:52 IST

मोदी सरकारने ५००, १००० च्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन सात महिने उलटले आहेत, शिवाय जुन्या नोटा बदलण्याची मुदतही संपली आहे

- लोकमत न्यूज नेटवर्कराबगाव / पाली (रायगड) : मोदी सरकारने ५००, १००० च्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन सात महिने उलटले आहेत, शिवाय जुन्या नोटा बदलण्याची मुदतही संपली आहे. मात्र सुधागड पाली येथून २ कोटी १९ लाख ६५ हजारांच्या जुन्या नोटा पाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पाली-खोपोली मार्गालगत खुरावले फाटा वसुधा फार्म येथे करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी खोपोलीकडून पालीकडे जाणाऱ्या दोन कार खुरावले फाटा येथे वसुधा फार्मच्या बाहेर उभ्या असताना पकडण्यात आल्या. यावेळी गाडीत बसलेल्यांकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची आणि संशयास्पद उत्तरे दिली. या दोन्ही गाड्यांची तपासणी केली असता गाड्यांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या. त्याचे मूल्य एकूण २ कोटी १९ लाख ६५ हजार रु पये आहे. या प्रकरणी पाली पोलिसात आरोपी प्रमोद सावंत (रा.दिवा), नवीन लक्ष्मीदास जोबानापुत्रा (रा.मानपाडा, डोंबिवली), मोती किसनचंद मुधुवानी (रा.उल्हासनगर) व इतर पाच असे एकूण आठ जणांच्याविरोधात मुंबई पोलीस अधिनियम १२४ अन्वये या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा असल्याने याबाबत न्यायालयाच्या आदेशान्वये पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली. आयकर विभाग, ठाणे व आरबीआय बँक, नवी मुंबई यांना या नोटांच्या पुढील कारवाईबाबत सविस्तर अहवाल पाठविला आहे.