- जयंत धुळप, अलिबाग
असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्ररेषेखालील ग्रामस्थ यांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर व्हावे यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या अटल पेन्शन योजनेचा रायगड जिल्ह्यातील १० हजार ३२८ ग्रामस्थांनी लाभ घेतला असून, त्यांचे वृद्धापकाळातील आयूष्य सुखकर झाले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील विविध बँकांनी घेतलेला पुढाकार महत्वपूर्ण ठरला आहे.१० हजार ३२८ लाभार्थी ग्रामस्थांमध्ये सर्वाधिक ३ हजार २९८ लाभार्थी बॅक आॅफ महाराष्ट्र या बॅकेच्या माध्यमातून झाले आहेत. उर्वरित बँक आॅफ बडोदाच्या माध्यमातून २ हजार ९२८, बँक आॅफ इंडिया १ हजार ३८५,आयडीबीआय बँक १ हजार ४०९, एचडीएफसी बँक ३२८, युनियन बँक आॅफ इंडिया २२७,सेंडिकेट बँक १६७, इंडियन ओव्हरसिज बँक १०४, कारर्पोरेशन बँक ८३, स्टेट बँक आॅफ हैद्राबाद-७३, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ५६, युको बँक ४७, कॅनरा बँक ३६, पंजाब नॅशनल बँक ३५, एक्सिस बँक ३१, फेड्रल बँक २२, महाराष्ट्र ग्रामीण बँक २१, स्टेट बँक आॅफ इंडिया २०,आयसीआयसीआय बँक १९, ओरियंटल बँक आॅफ कॉमर्स १६, देना बँक ८, विजया बँक ८, पंजाब अॅण्ड सिंध बँक ६ तर रत्नाकर बँकेच्या माध्यमातून एक असे हे एकू ण १० हजार ३२८ लाभधारक अटल पेन्शन योजनेंतंर्गत झाले आहेत.अटल पेन्शन योजना ही मुदतीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन पद्धतीद्वारे संचालित ही योजना आहे. शिवाय पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरणाद्वारे त्याचे नियमन केले जाते. ही योजना १जून २०१५ पासून कार्यान्वित झाली आहे. या योजनेत पेन्शनधारकाला वयाच्या ६० व्या वर्षांपासून पेन्शन मिळणार आहे. वर्गणीदाराला महिन्याच्या कोणत्याही तारखेला पैसे भरता येतात ,मात्र हप्ता चुकल्यास बँकेच्या नियमानुसार दंड भरावा लागेल.अटल पेन्शन योजनेत १८ ते ४० वर्षांची कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. ही योजना सर्व बचत बँक खातेदारांसाठी खुली आहे. वर्गणी ही पेन्शनधारकाच्या वयानुसार राहणार आहे. वर्गणीदाराने कमीतकमी २० वर्षे योजनेत पैसे भरले पाहिजेत. या योजनेतून ६० वर्षांच्या आत बाहेर पडता येणार नाही.वयानुसार राहणार वर्गणीअटल पेन्शन योजनेत १८ ते ४० वर्षांची कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. ही योजना सर्व बचत बँक खातेदारांसाठी खुली आहे. वर्गणी ही पेन्शनधारकाच्या वयानुसार राहणार आहे. वर्गणीदाराने कमीतकमी २० वर्षे योजनेत पैसे भरले पाहिजेत. सहभागी होण्यासाठी आधार कार्डला मूलभूत केवायसी दस्तावेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतून ६० वर्षांच्या आत बाहेर पडता येणार नाही.वारसांनाही लाभ मिळणार एक हजार पेन्शनसाठी१ लाख ७० हजार दोन हजार पेन्शनसाठी ३ लाख ४० हजार तीन हजार पेन्शनसाठी ५ लाख १० हजार चार हजार पेन्शनसाठी ६ लाख ८० हजार पाच हजार पेन्शनसाठी८ लाख ५० हजार रूपयांची जमा राशी वारसांना मिळणार आहे.लाभाचे स्वरूपजे वर्गणीदार १८ ते ४० या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी एक हजार ते पाच हजार प्रतिमाह पेन्शन मिळेल. या योजनेत केंद्र सरकार कमीतकमी एक हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या ५० टक्के रक्कम जमा करणार आहे. ३१ मार्च २०१६ पूर्वी उघडलेल्या नव्या खात्यामध्ये सरकार पाच वर्षांसाठी प्रिमियमच्या ५० टक्के योगदान देणार आहे. सरकार ही रक्कम फक्त अशा वर्गणीदारांना देईल, जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत सामील नाहीत. वर्गणीदाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार, पाच हजार रुपयांची पेन्शन कायमस्वरूपी वयाच्या ६० वर्षांपासून मिळेल. कोणत्याही बँक बचत खात्यातून परस्पर रक्कम जमा होऊ शकते. स्वावलंबन योजनेचे सभासद आपोआपच अटल पेन्शन योजनेत जोडले जातील.