शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास सभेला सत्ताधारी राहणार गैरहजर

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

रायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सदस्यांनीच अध्यक्षांसह चारही सभापतींवर अविश्वास ठाराव दाखल केल्यानंतर बहुतांश सत्ताधारी सदस्य गोव्याला फिरायला गेले आहेत.

- आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सदस्यांनीच अध्यक्षांसह चारही सभापतींवर अविश्वास ठाराव दाखल केल्यानंतर बहुतांश सत्ताधारी सदस्य गोव्याला फिरायला गेले आहेत. अविश्वास ठराव सिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २३ मार्चला विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्याच दिवशी दुपारी अर्थसंकल्पाची सभा बोलविण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी सदस्य अविश्वास सभेला गैरहजर तर अर्थसंकल्पाच्या सभेला हजर राहणार आहेत.पुढील सात दिवस सत्ताधारी गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आपापल्या विविध कामांसाठी येणाऱ्या जनतेला सत्ताधारी सापडणार नाहीत. त्यांच्या पदरी निराशा पडणार आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेवर शिवसेनेला सत्ता स्थापन करायची आहे. यासाठी त्यांनी सत्ताधारी पक्षातील नाराज सदस्यांना एकत्र करण्याच्या हालचाली तीव्र केल्या होत्या. सत्ताधाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्यासाठीही त्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या राजकीय व्यूहरचनेचा धसका घेतला होता. विरोधकांची व्यूहरचना भेदण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच स्वत:वरच अविश्वास ठराव आणण्याची खेळी करून विरोधकांना चांगलीच चपराक दिली होती.२३ मार्चला विशेष सभा बोलवण्यात आली असल्याने या कालावधीत कोणतेही राजकीय बदल होऊ शकतात, हे गृहीत धरून सत्ताधाऱ्यांनी नाराज सदस्यांना एकत्र करून दोन दिवसांपूर्वीच थेट गोवा गाठले आहे. सत्ताधारी सदस्यांमधील कोणत्याही सदस्याला पळविण्यात येऊ शकते. यासाठी सुमारे २५ सदस्य हे गोव्याला गेले आहेत. तेथे त्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये चांगलीच बडदास्त ठेवली जात असल्याचे एका सदस्याने सांगितले.सर्व सदस्य २२ मार्चपर्यंत गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटणार आहेत. पार्टी, मौजमजा यामध्ये आपला वेळ घालविणार आहेत. २३ मार्चला सर्व सदस्य एकत्रितरीत्या जिल्हा परिषदेमध्ये अर्थसंकल्पासाठी हजर राहतील. मात्र त्याच दिवशी सकाळी ११ वाजता होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या विशेष सभेला गैरहजर राहणार असल्याचे एका सदस्याने सांगितले. २०१६-१७ चा अर्थसंकल्प हा १०० कोटींपर्यंत पोचणार असल्याचे बोलले जाते.