शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

न. प. निवडणूक कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: October 24, 2016 02:49 IST

रोहा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी संपन्न होणार आहे. याबाबत उमेदवार, राजकीय पक्ष, अधिकारी वर्ग यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाब

रोहा : रोहा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी संपन्न होणार आहे. याबाबत उमेदवार, राजकीय पक्ष, अधिकारी वर्ग यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत घ्यावयाच्या खबरदारीची माहिती अवगत करण्यासाठी उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे बैठकीचे आयोजन केले होते. या सभेला तहसीलदार सुरेश काशिद, रोहा मुख्याधिकारी प्रकाश पाटील, पीआय निशा जाधव, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी नितीन सरकी उपस्थित होते. रोहा नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला असून २४ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत स. ११ ते ३ या वेळेत नगर परिषद सभागृहात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. या निवडणुकीचा निकाल २८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने नगरसेवक पदाच्या निवडणुका होणार असून नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून दिला जाणार आहे. रोहा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र . १ ते ७ मधून प्रत्येकी २ उमेदवार निवडून जाणार असून प्रभाग क्र . ८ मधून ३ उमेदवार निवडून जाणार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी फिक्या गुलाबी रंगाची मतपत्रिका राहणार आहे. प्रभाग क्र . १ ते ८ मधील अ उमेदवारासाठी पांढऱ्या रंगाची तर ब उमेदवारासाठी फिक्या निळ्या रंगाच्या मतपत्रिका वापरण्यात येणार आहेत. प्रभाग क्र मांक ८ मधील क उमेदवारांसाठी फिक्या पिवळ्या रंगाची मतपत्रिका वापरण्यात येणार असल्याचे बोंबले यांनी सांगितले. रोहा नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण २२ मतदान केंद्रे राहणार आहेत. निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे अथवा नाही याची पाहणी करण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. (वार्ताहर)