शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:41 IST

श्रीरंग बारणे यांच्या सूचना : कर्जत तहसील कार्यालयात आढावा बैठक

कर्जत : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ, कर्जत, खालापूर, उरण आणि पनवेल तालुक्याला बसला आहे. या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने त्यासाठी मदत जाहीर केली आहे. या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहता कामा नये. त्यासाठी सर्व नुकसानग्रस्तांचे काळजीपूर्वक पंचनामे करावेत. त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत, खालापूरमधील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा सोमवारी आढावा घेतला. कर्जत येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र घुले, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक संतोष पाटील, वेद दांडेकर, नगरसेविका प्राची डेरवणकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबू घारे उपस्थित होते.खासदार बारणे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. त्यात कर्जत, खालापूर, उरण, पनवेल तालुक्यांना फटका बसला आहे. त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. या नुकसानीची १०० टक्के भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यासाठी पंचनामे सुरू झाले आहेत. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये. ज्यांच्या पिकांचे, आंब्यांचे, झाडे आणि घरांचे नुकसान झाले आहे त्याची १०० टक्के भरपाई दिली पाहिजे. बाधित शेतकरी, नागरिकांना मदत मिळण्यासाठीचे सर्व पंचनामे काळजीपूर्वक पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्वांना मदत मिळाली पाहिजे. त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा, असे सूचित केले.चार-पाच दिवसांत वीज सुरळीत होईलवादळाचा महावितरणालादेखील फटका बसला आहे. विद्युत तारांवर झाडे पडली आहेत. अनेक ठिकाणचे पोल पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे, पण खेड्यापाड्यातील विजेची अद्याप दुरुस्ती झाली नाही. येत्या चार ते पाच दिवसांत ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणने दिल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड