शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निवडणुकीचे वेध

By admin | Updated: November 30, 2015 02:24 IST

नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. नगरपंचायत निवडणुकीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे

म्हसळा : नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. नगरपंचायत निवडणुकीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कोण होणार म्हसळा नगर पंचायतीचा नगराध्यक्ष, यावर देखील तर्क-वितर्क तालुक्यात सुरू आहेत. मी नगरसेवक होणारच या भूमिकेत असणाऱ्या काहींचा आरक्षण जाहीर होताच हिरमोड झाला आहे.निवडणुकीसाठी ५० टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव असल्याने १७ सदस्यांपैकी तब्बल ९ सदस्या या म्हसळ्यातील रणरागिणी महिला नगरपंचायतीत असणार आहेत. म्हसळा नगरपंचायतीत महिलाराज दिसणार आहे हे त्रिवार सत्य आहे. पुढच्या काही दिवसात नगरपंचायतीच्या निवडणुका होणार हे लक्षात ठेवून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष जोमाने कामाला लागला आहे. म्हसळा येथे शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस मजबूत आहे. याच हिंमतीवर शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येण्याचा निर्धार केला आहे. आज म्हसळ्यातील राजकीय स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अनुकूल असली तरी कॉँग्रेस आणि भाजपाचे तगडे आव्हान या दोघांना पेलावे लागणार आहे. त्यामध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील नाराजांनी वेगळी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असे समजते. त्यामुळे म्हसळा नगरपंचायतीची निवडणूक अटीतटीची होणार हे नक्की आहे. अजून तरी कुठल्याही पक्षाची युती झाली नसून सर्व पक्ष स्वबळावर लढणार असे चित्र आहे. (वार्ताहर)