शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणातून वृद्धाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:02 IST

दासगावमधील घटनेने खळबळ । खुनाची घटना सीसीटीव्हीत कैद

दासगाव : दासगाव गावामध्ये एका मद्याच्या दुकानात क्षुल्लक कारणातून झालेल्या वादाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका वृद्धाचा त्याच गावातील एका तरुणाने खून केला आहे. ही घटना सीसीटीव्हीतकैद झाली आहे. या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

महाडमधील दासगाव गावात एका मद्याच्या दुकानावर काम करत असलेल्या वृद्धाचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खुनाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्या आधारेच महाड शहर पोलिसांनी गावातील मयूरेश उर्फ लक्ष्या पड्याळ या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मयूरेश उर्फ लक्ष्या गोविंद पड्याळ (२७) हा आणि दिलीप दगडू साळवी यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री १०:१५ ते १०:३० च्या सुमारास सिगारेटच्या पैशावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात ठेवून मयूरेश याने रात्री धारदार शस्त्राने दिलीप साळवी यांचा गळा चिरून खून केला. दिलीप साळवी हे मूळ राहणार कुंबळे येथील असून, दासगाव येथे मद्यविक्रीच्या दुकानावर काम करत होते. याच ठिकाणी दुकानासमोर ते झोपले असताना मयूरेश याने हे कृत्य केले. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मद्य दुकानावर काम करणारे नूर हमजा भाटकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली.पोलिसात गुन्हा दाखलमयूरेश पड्याळच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे करीत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड