शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी काही फुटता फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 03:57 IST

महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी अपघात होतच आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई, सुट्टीचा काळ आणि कोकणातील पर्यटकांची गर्दी, यामुळे गेल्या महिन्याभरापासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी आणि अपघात सत्र सुरू आहे.

सिकंदर अनवारे दासगाव : महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी अपघात होतच आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई, सुट्टीचा काळ आणि कोकणातील पर्यटकांची गर्दी, यामुळे गेल्या महिन्याभरापासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी आणि अपघात सत्र सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्री दासगावजवळ तीन वाहनांच्या अपघातात जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. याला बेशिस्त वाहनचालक जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.कोकणातील चाकरमानी सध्या सुट्टीकरिता गावी येत आहेत. सुट्टीतील मजा अवलंबण्यासाठी परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम आणि महामार्गावरील गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अपघात मालिकाही कायम सुरू आहे. लवकर पोहोचण्याची घाई, ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवत आहेत. रस्त्याचे सुरू असलेले काम पाहता, वाहनचालकांनी आपले वाहन एका लेनमध्ये चालवणे अपेक्षित आहे. मात्र, महिन्याभरात झालेले बहुतांश अपघात हे ओव्हरटेकच्या नादात झाल्याचे दिसून येत आहे.शुक्र वारी मध्यरात्री तीन वाहने एकमेकांवर आपटल्याने वाहनांचे नुकसान झालेच; पण महामार्ग जवळपास दोन तास ठप्प होता.दासगाव खिंडीतील चढावाच्या ठिकाणी एक अवजड वाहन कमी वेगात चालत असतानाच, मागून येणारा कंटेनर आणि पिकअप जिप या दोन वाहनांना भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने जोरात धडक दिली. यामुळे महामार्गावर कोंडी होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, बेशिस्तपणे वाहन चालवत एकेरी लेन सोडून पुढे जाणाºया वाहनांमुळेही महामार्गावर वाहन चालवणे कठीण होऊन बसत आहे. बेशिस्त चालकांवर पोलिसांची कडक कारवाई अपेक्षित आहे.मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे. त्यातच अनेक ठिकाणी साइडपट्टीला मातीचे ढीग पडले आहेत. तर काही ठिकाणी साइडपट्टीच शिल्लक राहिलेली नाही. या सर्व कारणांमुळे कोंडी होते. या मार्गावर माणगाव, कोलाड, वडखळ, येथे बाजारपेठ महामार्गाच्या कडेलाच वसल्याने कायम कोंडी होते. वडखळ आणि पनवेलमधील कोंडी टाळण्यासाठी अनेक जण पालीमार्गे मुंबईचा पर्याय निवडत होते. मात्र, या मार्गाचेही काम सुरू आहे.टोलनाक्यावर कर्मचारी तैनात कशाला?महामार्ग वाहतूक पोलीस विभागाकडे आधीच पोलीस कर्मचारी अपुरे असताना, महाडसह इतर विभागातील महामार्ग पोलीस कर्मचारी खालापूर टोलनाक्यावर नेऊन का बसवले जात आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोकणात जाणारी वाढलेली वाहनसंख्या आणि महामार्गावर होणारे अपघात, वाहतूककोंडी यामुळे या ठिकाणी अधिक पोलीस कर्मचारी गरजेचे असतानाही खालापूर टोलनाक्यावर पोलीस तैनात केले जात असल्याने महामार्ग वाहतूक पोलीस विभागाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वाहतूक पोलिसांच्या अपुºया सोयीसुविधामहामार्गावर होणारे अपघात आणि वाहतूककोंडीवर मार्ग काढण्याकरिता महामार्ग वाहतूक पोलीस तैनात आहेत. मात्र, अपूर्ण सोयी-सुविधा असल्याने त्यांनादेखील वाहतूककोंडी दूर करणे कठीण जात आहे.महामार्ग विभागाकडे असलेली वाहने ही भंगार अवस्थेत असून, त्यातील काही वाहने बंद अवस्थेतच आहेत. महामार्ग वाहतूक पोलिसांकडे कर्मचारीदेखील अपुरे आहेत. क्रेन सुविधादेखील या विभागाकडे नसल्याने अपघात झाल्यानंतर पोलिसांना खासगी क्रेनचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी क्रे न घटनास्थळी येईपर्यंत तासभर वेळ जात असल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे.>अरुंद पूल वाहतूककोंडीस कारणीभूतमहामार्गावर माणगाव, वाकण, कोलाड या ठिकाणी असलेले पूल हे एकेरी पद्धतीचे आहेत. या ठिकाणीदेखील चौपदरीकरणाच्या पुलांचे काम सुरू आहे. यामुळे जुन्या पुलांवरूनच वाहतूक सुरू असून, या पुलावर एका बाजूने वाहनांनी प्रवेश केल्यानंतर दुसºया बाजूकडील वाहनांना थांबावे लागत आहे. या स्थितीमुळे वाढलेल्या वाहनांच्या चालकांना आणि प्रवाशांना त्रास होत आहे. या पुलाकडे महामार्ग पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे.