शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

श्री धावीर महाराजांना पोलिसांची मानवंदना

By admin | Updated: October 13, 2016 04:06 IST

रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

रोहा : रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तत्पूर्वी रायगड पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक निशा जाधव आणि पोलीस पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.पालखी सोहळ्यासाठी मंदिराचा संपूर्ण परिसर विविधरंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. भल्या पहाटे हा सलामी सोहळा आपल्या नजरेत टिपण्यासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. गोंधळ्यांची आरती, संबळ वाद्य, घंटानाद आणि नगाऱ्यांच्या आवाजाने आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या मंगलमय वातावरणात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. तद्नंतर ढोल-ताशांच्या गजरात मार्गस्थ झालेली महाराजांची पालखी ग्रामस्थांना दर्शन देत दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परतते. यावेळी पुन्हा महाराजांना पोलीस मानवंदना देण्यात येते. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फुलांनी आणि सडा-रांगोळ्यांनी बहरलेले रस्ते आणि विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात आल्ोली रोषणाई या सोहळ्याला एक वेगळे रूप प्राप्त करून देते. हा रोहेकरांसाठी एक कौटुुंबिक, धार्मिक सोहळाच असतो. रोह्यात पालखीच्या दर्शनासााठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक मंडळांमार्फत थंड पेये आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते. येथील आशीर्वाद मंडळातर्फेगेली अनेक वर्षे भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था केली जात आहे.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. प्रशांत ठाकूर, आ. अवधुत तटकरे, नगराध्यक्ष समीर शेडगे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, उत्सव समितीचे अध्यक्ष दत्ता जगताप, विश्वस्त नितीन परब, विजयराव मोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)