शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये नि:शुल्क दाखल्यांसाठी रुग्णांकडून घेतले जाताहेत पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:16 IST

जिल्हा रु ग्णालयातील प्रकार : वरिष्ठांकडे तक्रार करूनही कारवाई नाही

निखिल म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात रु ग्णांसाठी विविध प्रकारचे २० दाखले देण्यात येतात. हे दाखले नि:शुल्क असूनही पैसे उकळण्यात येत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतची तक्रार जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होऊनही अद्याप अर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

वयाचा दाखला, मूक-कर्णबधीर, मानसिक रुग्ण, गतिमंद, अस्थीव्यंग, अंध, अशा प्रकारचे जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी २० प्रकारचे दाखले दिले जातात. या दाखल्यांसाठी बुधवारी रुग्णांची गर्दी झालेली असते. एका रुग्णाला एक दाखला मिळविण्यासाठी चार वेळा फे ºया माराव्या लागत आहेत. हे रुग्ण जिल्ह्यातील वाडीवस्तीवरून येणारे असतात. त्यांना एका दाखल्यासाठी सतत अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात सारख्या फेºया मारणेआर्थिकदृष्ट्या न परवडणारे असते.दाखला मिळण्यासाठी तेथील संबंधित कर्मचाºयांना पैसे दिल्यास ते तत्काळ दाखला करून देतात. त्याबरोबरच एखादा रुग्ण हा कमी प्रमाणात अपंग असेल तर डॉक्टरची नजरआड करून त्यास ८० ते ९० टक्के अपंग असल्याचा दाखला देतात. त्यामुळे खरा अपंग असलेल्या रुग्णाला आपला हक्काचा दाखला मिळण्यासाठी मात्र जिल्हा रुग्णालयाच्या दरबारी सतत फेºया माराव्या लागत आहेत, त्यामुळे रुग्णाबरोबर त्याच्या नातेवाइकांना दाखला कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

रुग्णांना देण्यात येणारे व्याधींचे वा दिव्यांगांचे प्रमाणपत्र देताना हे कर्मचारी त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. यासंदर्भात या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे संबंधितांची तक्रारही केली होती. मात्र, त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय दाखल्यांमध्ये अशा कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण सुरू नाही, तसे प्रकार जिल्हा रुग्णालयात निदर्शनास आले अथवा तशा लेखी तक्रारी आल्या तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच कुठल्या कर्मचाºयांनी लाच मागितल्यास त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.- डॉ. अर्चना सिंह, वैद्यकीय अधिकारी, बाह्य संपर्क