शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मिनीट्रेन बंदचा आदिवासींना फटका

By admin | Updated: May 14, 2017 22:53 IST

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांच्या दिमतीला असलेली नेरळ-माथेरान

मुकुंद रांजणे  लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांच्या दिमतीला असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन यावर्षी बंद असल्याने अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. त्यात जंगलातील रानमेवा पर्यटकांना विकणाऱ्या आदिवासींचा रोजगार मिनीट्रेन बंद असल्याने हिरावला आहे. जुम्मापट्टी भागातील शेकडो आदिवासी विद्यार्थी आणि त्यांच्या माता रानमेवा विकण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करून माथेरान गाठत आहेत. मात्र माथेरान मिनीट्रेनच बंद असल्याने रानमेवा विकून शाळेची वह्या, पुस्तके, दप्तर,कपडे विकत घेण्यासाठी काही पैसे गोळा करण्याचा आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रयत्न अपुरा ठरत आहे.नेरळ-माथेरान मिनीट्रेन आपला शतक महोत्सव साजरा करून पर्यटकांच्या सेवेत आहे. या मिनीट्रेनचा नेरळ-माथेरान हा २१ किलोमीटर लांबीचा प्रवास या घाटातील आदिवासी लोकांचे रोजगाराचे प्रमुख साधन होते. कारण वर्षातील आठ महिने मिनीट्रेनच्या मार्गातील जुम्मापट्टी आणि वॉटरपाइप या स्थानकात ज्या स्थानिक वस्तू, जंगलातील रानमेवा प्रवाशांना मिळायचा त्या सर्व वस्तू स्थानिक आदिवासी लोक पर्यटक प्रवाशांना विकून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात हातभार लावत. उन्हाळ्यातील दोन महिने तर माथेरान मिनीट्रेनसाठी पर्यटन हंगाम असल्याने मिनीट्रेनच्या सर्व फेऱ्या या गर्दीच्या असत. त्या गाडीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना माथेरानच्या डोंगरातील रानमेवा विकून आदिवासी विद्यार्थी हे पुढील शैक्षणिक वर्षासाठी वह्या, पुस्तके, कपडे, दप्तर, आदी साहित्य खरेदी करण्यासाठी आपल्या आईबरोबर प्रामुख्याने जुम्मापट्टी आणि वॉटरपाइप रेल्वे स्टेशनमध्ये व्यवसाय करताना दिसायचे. या दोन्ही स्थानकात जुम्मापट्टी, माणगाववाडी, धनगरवाडा, धसवाडी, कोंबळवाडी, बेकरेवाडी, आसलवाडी, मण्याचामाळ, नाण्याच्यामाळ येथील आदिवासी विद्यार्थी मिनीट्रेनमधून प्रवास करणाऱ्या पर्यटक प्रवाशांना जंगलातील रानमेव्याची भेट द्यायचे. या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचा हा अनेक वर्षे उन्हाळ्याच्या सुटीत चाललेला व्यवसाय असायचा. यावर्षी या सर्व विद्यार्थ्यांना मिनीट्रेन बंद असल्याने जुम्मापट्टी आणि वॉटरपाइप ऐवजी थेट अमन लॉज तसेच माथेरान गाठावे लागत आहेत. त्यासाठी सकाळी लवकर उठून घरापासून ७ ते १० किलोमीटरचा पल्ला गाठत माथेरानचा दस्तुरी नाका गाठावा लागतो. त्यापुढे अमन लॉज या रस्त्याच्या कडेला अनेक आदिवासी लहान मुले-मुली रानमेवा विकत बसलेल्या दिसून येतात.