शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये १०८ रुग्णवाहिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 03:55 IST

या पर्यटन स्थळावर दरवर्षी लाखो पर्यटकांची नियमितपणे हजेरी असते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णांची देखभाल करणे ही स्थानिक प्रशासनाची महत्त्वाची

- लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : या पर्यटन स्थळावर दरवर्षी लाखो पर्यटकांची नियमितपणे हजेरी असते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णांची देखभाल करणे ही स्थानिक प्रशासनाची महत्त्वाची भूमिका आहे. नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी येथील प्रामुख्याने भेडसावत असलेल्या स्थानिकांसह पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक सेवा म्हणून १०८ ही रुग्णवाहिका सर्वच सोयीस्कर सुविधेसह मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली होती. याची दखल घेत आरोग्य मंत्र्यांनी येथे ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांना कुणी घोड्यावरून पडून जखमी झाल्यास अथवा अन्य कारणाने त्रस्त झाल्यास त्याला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत यासाठी सातत्याने गटनेते प्रसाद सावंत यांनी सुद्धा चार महिन्यांपूर्वी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी लवकरच माथेरानमधील स्थानिकांच्या तसेच पर्यटकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक यंत्रणायुक्त रु ग्णवाहिका उपलब्ध व्हावी अशा आशयाचे लेखी निवेदन दिल्यावरून सध्या ही रु ग्णवाहिका सर्वांच्या सेवेसाठी आरोग्य मंत्र्यांनी या पर्यटनस्थळासाठी उपलब्ध करून दिली आहे. मागील वर्षात चार लोकांना हृदयविकाराने अत्यावश्यक सेवा उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले होते, तर कुणा रु ग्णाला तातडीने अन्य ठिकाणी न्यावयाचे झाल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन या रु ग्णवाहिकेत डिफेब्रिलेटर, व्हेन्टिलेटर, व्ह्यालूमेट्रिक, इंफ्युजन पंप, सिरिंज इंफ्युजन पंप, मॉनिटर अशा स्वरूपाची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित असल्याने जर एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब या गाडीत उपचार केले जातील. तसेच अन्य उपकरणांचा उपयोग सुद्धा रु ग्णाला हितकारी असणार आहे. एकंदरीतच या गाडीत असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून रु ग्णांचे प्राण वेळप्रसंगी वाचण्यास मदत होणार आहे. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.नव्या धाटणीच्या अत्याधुनिक यंत्रणेच्या व्यवस्थेमुळे ही रु ग्णवाहिका सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे अनेकांचे वेळप्रसंगी प्राण वाचू शकतील.- डॉ. उदय तांबे