शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

मनश्रीने मिळवला संविधानकन्येचा मान

By admin | Updated: February 28, 2016 03:32 IST

भारतीय नागरिकांना हक्क देऊन कर्तव्यांची जाणीव करून देणारे ‘भारतीय संविधान’ (राज्यघटना) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतास दिली. परंतु संविधान म्हणजे

- जयंत धुळप,  अलिबागभारतीय नागरिकांना हक्क देऊन कर्तव्यांची जाणीव करून देणारे ‘भारतीय संविधान’ (राज्यघटना) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतास दिली. परंतु संविधान म्हणजे नेमके काय, त्यात नक्की काय आहे, भारतीय नागरिक म्हणून त्याच्याशी आपला नेमका संबंध काय, याची माहिती अनेकांना नसते. मात्र अवघ्या १२ वर्षांच्या मनश्रीने संविधान तोंडपाठ केल्याने अनोखा विक्रम केला आहे. ‘संविधानकन्ये’चा नावलौकिक मिळवणाऱ्या मनश्री आंबेतकरचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अलिबाग नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा (मराठी) क्र. १चे मुख्याध्यापक संतोष आंबेतकर यांची मनश्री ही कन्या. सेंट मेरी कॉन्व्हेंट शाळेत ती इयत्ता सातवीत शिकते. मनश्रीचे वडील संतोष यांना काही वर्षांपूर्वी त्यांच्या शैक्षणिक जीवनात मोठा अन्याय सहन करावा लागला. त्या घटनांनी तिच्या मनात घरच केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वडिलांना अन्याय सहन करावा लागला तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच्या काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना किती अन्याय सहन करावा लागला असेल असा विचार सहावीतील मनश्रीच्या मनात आला. नागरिकशास्त्राच्या पुस्तकात तिने भारतीय संविधानाचा काहीसा अभ्यास केला होता. या साऱ्या परिस्थितीतूनच तिने भारतीय संविधान प्रथम वाचण्याचा चंग बांधला. मनश्रीच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन, अलिबागमधील जय रोहिदास फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन आंबेतकर यांनी मनश्रीचा सत्कार केला. सुट्टीत संविधानाचे वाचन-पाठांतरमनश्रीने सहावीची परीक्षा संपताच वडिलांना संविधानाची प्रत आणून देण्यास सांगितले; आणि ते तोंडपाठ करण्याचा निर्धार केला. संविधानाचे प्रास्ताविक, अनुक्रमणिकेपासून २२ प्रकरणे, ३९५ कलमे, त्यांची उपकलमे, परिशिष्टे आणि अनुसूचीच्या काही दुरुस्त्या मनश्री १ तास १० मिनिटांमध्ये इंग्रजी भाषेतून बिनचूक तोंडपाठ म्हणून दाखविते.आमच्या कुटुंबावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. आयुष्यात जे काही कटू अनूभव आले त्या वेळी संविधानानेच मोठा आधार दिला. परिणामी, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घरात मुलांना लहानपणापासूनच सांगत आलो आहे. त्यातूनच मनश्रीने स्फूर्ती घेऊन ही किमया करून दाखविली.- संतोष आंबेतकर, मनश्रीचे वडील