शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खाणपट्ट्यांचा होणार मेकओव्हर

By admin | Updated: September 26, 2016 02:21 IST

नैसर्गिक साधन संपत्तीवर घाला घालून गौण खनिजाच्या उत्खननातून सरकारला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र यातून होणाऱ्या विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी सरकारने

आविष्कार देसाई,  अलिबागनैसर्गिक साधन संपत्तीवर घाला घालून गौण खनिजाच्या उत्खननातून सरकारला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र यातून होणाऱ्या विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये खनिज विकास प्रतिष्ठान स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रतिष्ठान स्वामित्वधनाच्या १० टक्के रक्कम अधिक आकारुन त्या निधीतून खाणपट्टा परिसराचा मेकओव्हर करणार आहे. रॉयल्टी भरलेली असताना देखील आणखीन कर कशाला असा दबका सूर काही खाणपट्टाधारकांनी लावला आहे. या योजनेमुळे रायगड जिल्ह्यात सुमारे १५ कोटी रुपयांची विकासकामे होण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जाते. खाणपट्ट्यातील नागरिकांच्या व्यथा सर्वप्रथम ‘लोकमत’ने मांडल्या होत्या. तेथील नागरिकांना सोयी-सुविधांसाठी वेगळ््या निधीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याने उरण तालुक्यात खाणपट्टा कामगारांसाठी काम करणाऱ्या सिध्दार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटना, आगरी समाज शेतकरी विकास प्रबोधिनी अशा संघटनांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची डेव्हलमेंट जिल्ह्यात होत आहे. विकासकामांसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा बळी दिला जातो. विकासकामांसाठी लागणारे दगड, माती, रेती, मुरुम, बॉक्साइट, तांबे, लोह असे विविध खनिज निसर्गाच्या कुशीतूनच घेतले जाते. यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये खाणपट्टे लिलावाने दिले जातात. यासाठी खाणपट्टेधारकांकडून स्वामित्व धनाच्या माध्यमातून ठरावीक रक्कम आकारण्यात यायची मात्र स्वामित्व धनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून त्या खाणपट्टा परिसराचा विकास साधणे शक्य नव्हते.खाणपट्टा विभागातील उत्खनन केल्यामुळे तेथील परिसराचे विद्रूपीकरण व्हायचे. तेथील रस्त्याची दैना उडायची त्याचप्रमाणे तेथील गावातील, वस्तीतील स्थानिकांना वेगवेगळ््या समस्येला तोंड द्यावे लागायचे. त्या परिसरात सोयी-सुविधा देण्यासाठी निधीची आवश्यकता होती. तसेच बेकायदा खाणपट्ट्यांमुळे सरकारचा दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत होता. हा आर्थिक फटका सहन करताना सरकारच्या नाकीनऊ आले होते. महसूल वाढविणे आणि बेकायदा खाणपट्ट्यांना अटकाव करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची होती.यावर उपाय म्हणून सरकारने प्रत्येक जिल्ह्यात खनिज विकास प्रतिष्ठान स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या परिसरात खाणपट्टे लिलावाने दिले आहेत त्यांच्यावरील स्वामित्वधनाच्या १० टक्के अधिक रक्कम प्रतिष्ठानला घेता येणार आहेत. या मिळालेल्या रकमेतून खाणबाधित विभागातील रस्ते, आरोग्य सुविधा, लाइट, पाणी, नाले असे विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळणार असल्याचे आगरी समाज शेतकरी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी सांगितले.२०१५-१६ या कालावधीत गौणखनिजाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला सुमारे १०७ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. त्यानुसार स्वामित्वधनाच्या १० टक्केप्रमाणे १० कोटी ७० लाख अधिक प्रशासनाला प्राप्त झाले असते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात यावर अंमलबजावणी होणार आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात गौणखनिजाचे उद्दिष्ट सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार असल्याने स्वामित्वधनाच्या १० टक्के मिळणारी रक्कम निश्चितच १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठानला त्या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही आणि तेथे वेगाने विकास होण्यातील अडथळा दूर होणार आहे.