शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

बहिष्काराचा गुन्हा अजामीनपात्र करा

By admin | Updated: December 3, 2015 00:46 IST

महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम २०१५ च्या प्रारूपाचे कायद्यात रूपांतर होत असताना, सामाजिक बहिष्काराचा गुन्हा हा येऊ घातलेल्या कायद्यान्वये अजामीनपात्र

- जयंत धुळप,  अलिबागमहाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम २०१५ च्या प्रारूपाचे कायद्यात रूपांतर होत असताना, सामाजिक बहिष्काराचा गुन्हा हा येऊ घातलेल्या कायद्यान्वये अजामीनपात्र गुन्हा असणे अत्यावश्यक आहे. यामुळे राज्यातील अशी कामे करणाऱ्यांना वचक बसून, या कुप्रथेचे समूळ निर्मूलन होऊ शकेल, अशी मागणी रायगड जिल्ह्णातील वाळीतग्रस्त कुटुंबांनी राज्य शासनास या प्रारूपाच्या हरकती व सूचनामधून केली आहे. मानवी हक्कविषयक कायदेतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. असीम आणि अ‍ॅड. रमा सरोदे यांनी राज्य शासनास सादर केलेल्या या कायद्याचे प्रारूप गेल्या दोन आठवड्यापूर्वी राज्य शासनाने वेबसाइटवर प्रसिद्ध केले. त्या अनुषंगाने राज्यातील वाळीतग्रस्त व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सूचना व हरकती मागवल्या होत्या. त्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्या निमित्ताने येतील तुषार विश्रामगृहात एका छोटेखानी परिषदेचे आयोजन जिल्ह्णातील वाळीतग्रस्त कुटुंबांच्या प्रतिनिधींनी केले होते. यावेळी अलिबाग आणि श्रीवर्धन तालुक्यातील वाळीतग्रस्तांनी झालेल्या अन्यायांचा पाढा वाचला. आम्ही वर्षानुवर्ष हा अत्याचार सहन करीत होतो. अशा परिस्थितीत केवळ माध्यमांनीच आमचीबाजू मांडली. असे यावेळी वाळीग्रस्तांनी सांगितले.,हक्क संरक्षित करण्यावर भर -या कायद्यात समाज (कम्युनिटी), सामाजिक बहिष्कार, जातपंचायत, जातीचे सदस्य, अन्यायग्रस्त व्यक्ती, प्रोबेशन आॅफिसर (सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी), मानवी हक्क, मानवी हक्क न्यायालय अशा व्याख्यांचा समावेश आहे. -कलम ३ मध्ये सामाजिक बहिष्कार किंवा वाळीत टाकणे याविषयी विस्तृत माहितीआहे. याची तक्रार पोलिसांकडे किंवा थेट न्यायाधीशांकडे तक्रार अर्जाच्या स्वरूपात केली जाईल.यातील घटना व वस्तुस्थितीनुसार तत्काळ आणि तात्पुरते आदेश पारित करून अन्यायग्रस्तांना दिलासा देण्याचे अधिकार न्यायाधीशांना आहेत. हक्क संरक्षित करण्यावर भर देणारा हा कायदा असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.