शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

महाडची ग्रामदेवता जाखमाता देवी

By admin | Updated: October 22, 2015 00:08 IST

पुरातन काळापासून ते शिवकाळापर्यंत महाडची ग्रामदेवता जाखमातेच्या अस्तित्वाच्या खुणा आजही महाडमध्ये आढळतात. खरेतर कोकणात अनेक ठिकाणी जाखमाता देवीची

महाड : पुरातन काळापासून ते शिवकाळापर्यंत महाडची ग्रामदेवता जाखमातेच्या अस्तित्वाच्या खुणा आजही महाडमध्ये आढळतात. खरेतर कोकणात अनेक ठिकाणी जाखमाता देवीची मंदिरेही आहेत. जाखडी या कोकणातील पारंपरिक नृत्यकलेच्या नावाशी साधर्म्य असलेला जखडणे या शब्दाच्या उत्पत्तीतून जाखमाता हा शब्द आलेला आहे. त्यामुळे भक्तांशी घट्ट नाते सांगणारी देवी असा तर्क काढला जातो. आजही या जाखमाता देवीचे महात्म्य भक्तांच्या श्रद्धेमुळे अधोरेखित झालेला आहे.महाडमधील हे जाखमातेचं पाषाणरूपी देवस्थान महाडच्या इतिहासकालीन कोट किल्ल्याच्या पूर्वच्या द्वारापाशी आहे. हेमाडपंथीय बांधकाम असलेल्या या छोट्याशा मंदिराभोवती सभामंडप घातल्यामुळे या मंदिराचे भव्य स्वरूप दिसते. जाखमाता हे यक्षिणीचा अवतार असल्याने व्यापारीवर्गाची ही देवी, असेही तिला संबोधले जाते. महाडच्या प्रसिद्ध छबिना उत्सवाची सुरुवात जाखमाता देवीच्या पालखीशिवाय होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही काळ संभाव्य वास्तव्य असलेल्या कोट किल्ल्याची रक्षणकर्ती म्हणून या जाखमाता देवीकडे पाहिले जाते. तिच्या हातात ढाल व तलवार आहे. देवीचे मोठे डोळे व शांत, तेजलदार चेहरा असं हे रूप भक्तांना भावतं. (वार्ताहर)रेडा कापण्याची प्रथा बंदपूर्वीच्या काळी या देवीसमोर रेडा कापण्याची प्रथा होती. मात्र ही प्रथा बंद करावी, अशी मागणीवजा विनंती करवा या व्यापारी कुटुंबातील एका महिलेने ग्रामस्थांकडे केली. ही पूर्वापार प्रथा बंद केल्यास आपण देवीचे मंदिर बांधून देऊ, असे या करवा कुटंबातील महिलेने ग्रामस्थांना सुचवले. हा एक सामाजिक विचार मान्य केला आणि रेडा कापण्याची अघोरी प्रथा बंद करण्यात आली.