शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये बसला महाआघाडीला धक्का

By admin | Updated: October 26, 2016 05:25 IST

अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापला शह देण्यासाठी सर्वपक्षीयांच्या महाआघाडीमध्ये आम आदमी पार्टी (आप) सामील नाही. आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार

अलिबाग : अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापला शह देण्यासाठी सर्वपक्षीयांच्या महाआघाडीमध्ये आम आदमी पार्टी (आप) सामील नाही. आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार नसल्याचे आपचे कार्यकर्ते दिलीप जोग यांनी स्पष्ट केले. आपच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सर्वपक्षीय महाआघाडीला निवडणुकीआधीच चांगलाच धक्का बसल्याचे बोलले जाते.शेकापची राजवट उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची महाआघाडी झाली आहे. या आघाडीमध्ये मनसे, आप या सह अन्य पक्षांना सामावून घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमख दीपक रानवडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले होते. मात्र या महाआघाडीमध्ये आपने सामील नसल्याने महाआघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. आपने गेल्या दोन वर्षात सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर आवाज उठविला होता. रस्ते, पाणी आणि आरोग्य सेवा यावर विविध आंदोलने आपने केली होती. त्यामुळे आपची जनसामान्यांमध्ये चांगलीच ओळख झाली होती.अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापची एक हाती सत्ता आहे. विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याच नेतृत्वाखाली आताच्या निवडणुका लढण्याचे पक्षश्रेष्ठीने जाहीर केले आहे. प्रशांत नाईक यांची असलेली लोकप्रियता पाहूनच पक्षाने नाईक यांच्यावर पुन्हा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सोपवली आहे. त्यामुळे शेकापला टक्कर देणे कोणत्याही एका पक्षाला शक्य नाही. हे माहीत असल्यानेच काँग्रेस, शिवसेना, भाजपा या प्रमुख पक्षांनी महाआघाडीची मोट बांधली. त्यामध्ये छोट्या पक्ष्यांना सामावून त्यांना काही जागा देण्याचा फॉर्म्युला होता. मात्र आप या महाआडीत सामील होणार नसून कोणतीही जागा लढणार नसल्याचे आपचे दिलीप जोग यांनी स्पष्ट केले आहे. आपमुळे महाआघाडीला निवडणुकीपूर्वीच जबरदस्त धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वीच असा धक्का बसल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)अलिबाग नगरपालिकेमध्ये शेकापची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे शेकापची राजवट उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची महाआघाडी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आपमुळे धक्का बसल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाआघाडीला शेकापला नामोहरण करण्यासाठी आणखीन ठोस पावले उचलावी लागणार असल्याचे दिसून येते. आप महाआघाडीत सामील होणे न होणे हा त्यांचा निर्णय आहे. परंतु महाआघाडी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक रानवडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.