शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी विशेष मुलांनी बनवल्या पणत्या

By admin | Updated: October 26, 2016 05:24 IST

निर्मात्याने आपल्या वाट्याला दिलेल्या जीवनास दोष न देता व्यावसायिक प्रशिक्षण घेवून, व्यक्तिगत जिद्दीतून अथक मेहनतीने आपल्या चिमुकल्या हातातून

- जयंत धुळप, अलिबागनिर्मात्याने आपल्या वाट्याला दिलेल्या जीवनास दोष न देता व्यावसायिक प्रशिक्षण घेवून, व्यक्तिगत जिद्दीतून अथक मेहनतीने आपल्या चिमुकल्या हातातून साकारलेल्या सहा हजार सौंदर्यपूर्ण पणत्यांमध्ये यंदाच्या दीपावलीत दीपज्योती उजळणार आहेत. या सुखद भावनेनेच या सहा हजार पणत्यांचे निर्माते पेण येथील आई डे केअर संस्थेतील विशेष मुले सध्या भारावून गेली आहेत.आई डे केअर संस्थेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी व्यावसायिक मार्गदर्शन घेऊ न संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या काळात छोटे व मोठे गणेश वाहक उंदरांच्या सुबक मूर्ती बनविल्यानंतर आता दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी पणत्या बनविण्याचे काम, या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊ न स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. आपल्या संस्थेच्या नवीन इमारतीच्या उभारणीत या माध्यमातून आर्थिक हातभार लावण्याची एक मानसिकता देखील या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. यावर्षी अवघ्या १५ ते २० दिवसांच्या अल्प कालावधीत या मुलांनी तब्बल सहा हजार पणत्या तयार केल्या. या पणत्या पेण बाजारात लक्ष्मी नारायण मंदिर, आलिशान सुपर मार्केट, अ‍ॅक्सीस बँक या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता अशा व्यावसायिक प्रशिक्षणातून संस्थेतील ११ मुले मानधन घेवून स्वत:च्या पायावर उभे राहिले असल्याची माहिती आई डे केअर संस्थेच्या कार्याध्यक्षा स्वाती मोहिते यांनी दिली.विशेष मुले आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या कारणाने दुसऱ्यावर अवलंबून असतात. या मुलांना विशेष शिक्षण देणे, त्यांना योग्य थेरेपी देणे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे, आई-वडिलांच्या पश्चात किंवा हयातीत त्यांची उत्तम प्रकारे देखभाल करणे, ही काळाची गरज ओळखून या संस्थेने या मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र १५ जून २०१६ रोजी पेण येथे सुरू केले असून, सद्यस्थितीत येथे ४२ विद्यार्थी व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. विशेष मुलांमध्ये अनेक प्रकारचे कलागुण दडलेले असतात. त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता या कलेला वाव देण्याचे काम आई डे केअर संस्थेच्या माध्यमातून कार्याध्यक्षा स्वाती मोहिते व त्यांचे सहकारी १३ शिक्षक व कर्मचारी हे करीत असून, या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या वस्तूंची जास्तीत जास्त खरेदी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.१५ ते २० दिवसांच्या अल्प कालावधीत या मुलांनी तब्बल सहा हजार पणत्या तयार केल्या. या पणत्या पेण बाजारात लक्ष्मी नारायण मंदिर, आलिशान सुपर मार्केट, अ‍ॅक्सीस बँक या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले आहे.