शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले सरकार’ योजनेत कोकण अग्रेसर

By admin | Updated: October 14, 2016 06:49 IST

‘आपले सरकार’ योजनेअंतर्गत जनतेकडून विचारण्यात आलेली माहिती तातडीने त्यांना देण्याचा कामात कोकण महसूल विभागाने प्रभावी कामगिरी बजावली

जयंत धुळप / अलिबाग‘आपले सरकार’ योजनेअंतर्गत जनतेकडून विचारण्यात आलेली माहिती तातडीने त्यांना देण्याचा कामात कोकण महसूल विभागाने प्रभावी कामगिरी बजावली आहे. सेवा हमी कायदा अंमलबजावणीत देखील ९९.९९ टक्के परिणाम साध्य केला आहे.कोकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले असून त्याचा निपटारा देखील गतिमानतेने करण्यात आला आहे. सेवा हमी कायदा अंमलबजावणीत ग्रामविकास विभागाने एकूण १३ सेवा अधिसूचित केल्या असून ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यामध्ये यावर्षी आॅगस्टअखेर ४ लाख ४४ हजार ८५० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ९९.९९ टक्के म्हणजे ४ लाख ४४ हजार ८०५ अर्ज कार्यवाहीअंती निकाली काढण्यात आले. प्रथम अपील प्राप्त ८२, निर्गत ८२ आणि द्वितीय अपील प्राप्त ४ व निर्गत ४ अशी अर्जांची सद्यस्थिती आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवर १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट दरम्यान ५३८ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४९८ अर्जावर कार्यवाही केली आहे. यातील ४६५ अर्जांबाबत निर्णय देखील देण्यात आला आहे. ७३ अर्ज प्रलंबित आहेत.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीत महूसल विभागामार्फत गेल्या ९ महिन्यात कोकणातील पाच जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगर अशा ७ जिल्ह्यामध्ये ११ लाख ५८ हजार ९४६ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ११ लाख ४५ हजार ५३३ अर्जांना नियोजित मुदतीत सेवा देण्यात आली. ही टक्केवारी देखील ९९ टक्के आहे. १३ हजार ४१३ अर्ज प्रलंबित असून हे सर्व मुदतीत आहेत. नागरिकांकरिता माहितीचा अधिकार आॅनलाइन करणारे महाराष्ट्र जसे पहिले राज्य ठरले तसेच सेवा हमी कायद्यातील सेवा आॅनलाइन देणारे देखील महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या सेवा हमी कायद्यांतर्गत राज्यातील नागरिकांना सेवा देण्यासाठी विशेष अधिकार देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाने आपले सरकार हे वेब पोर्टल डिजिटल महाराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने २६ जानेवारी २०१५ रोजी सुरू केले, तद्नंतर १५ आॅगस्टपासून वेबपोर्टलचा दुसरा टप्पा कार्यान्वित झाला असून त्यात राज्यातील सहा महसुली विभागातील ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.