शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जोगेश्वरी मंदिराच्या वैभवात पडणार भर

By admin | Updated: October 20, 2015 23:49 IST

येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराज,व्याघ्रेश्वर महाराजांचे पुरातन मंदिराचा पंधरा वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून लोकवर्गणीच्या माध्यमातून अद्ययावत असे मंदिर बांधण्यात

नागोठणे : येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराज,व्याघ्रेश्वर महाराजांचे पुरातन मंदिराचा पंधरा वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून लोकवर्गणीच्या माध्यमातून अद्ययावत असे मंदिर बांधण्यात आले आहे. शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून रायगड जिल्ह्यात त्याची गणना होत आहे. मंदिराबरोबर परिसराचे सुद्धा सुशोभीकरण करण्यात आले असल्याने नागोठणेकरांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून या भागाला ओळखले जात आहे. मंदिराला पुन्हा रंग देण्याचा निर्णय घेतला असून या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे जोगेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांनी मुलाखतीत सांगितले. येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराज, व्याघ्रेश्वर महाराज यांचे दीडशे ते दोनशे वर्षे येथे वास्तव्य आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेची पालखी आणि नवरात्रौत्सव असे कार्यक्र म घेतले जातात. नागोठणेच्या पूर्वेला (आताचे रेल्वे स्थानकाजवळ) डोंगरावर या देवीचे मूळ स्थान आहे. त्याकाळात नागोठणे शेजारील मुरावाडी येथील हिरू ताडकर यांच्या स्वप्नात देवीने येवून सांगितले, की पूर्वेच्या डोंगरावर मी असून तेथून मला उचल व तुला जेथे मी जड होईन तेथे मला सोडून दे. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे ताडकर यांनी डोंगरावर जावून देवीचा शोध घेतला असता, त्यांना देवीची मूर्ती (पाषाण) आढळून आली. पाषाण डोक्यावर घेवून ते नागोठणे मार्गे मुरावाडीला जात असताना येथील तीन तळ्याजवळ मूर्ती जड झाली व त्यांना पुढे मूर्ती नेणे अशक्य झाल्याने त्यांनी ती खाली ठेवली व कालांतराने देवीची येथे स्थापना करण्यात आली अशी आख्यायिका सांगितली जाते. १६ वर्षांपर्वूी जीर्णोद्धारपूर्वी असणाऱ्या बैठ्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा नरेंद्र जैन यांच्या पुढाकाराने निर्णय घेण्यात आला व पंधरा - सोळा वर्षांपूर्वी येथे सुबक असे मंदिर बांधण्यात आले. अनेक दैवतांची मंदिरे येथे असल्याने दररोज हजारो नागरिक या भागात येत असतात.मंदिरासमोर दोन तलाव असल्याने त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे, माजीमंत्री रवीशेठ पाटील, आ. अनिल तटकरे यांनी या कामासाठी लाखो रु पयांचा निधी उपलब्ध करून दिला.