शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

तटकरेंच्या प्रचारासाठी शेकापच्या जयंत पाटलांचे कुटुंबच मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 00:17 IST

‘साथी हाथ बढाना’ : गावबैठका, मतदारांच्या गाठीभेटी, प्रचारपत्रके वाटण्यावर भर

- आविष्कार देसार्ई 

अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी शेकापने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेकापच्या आतापर्यंत प्रचाराच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. गावबैठका, मतदारांशी थेट भेट आणि प्रचारपत्रके वाटण्यावर त्यांनी भर दिला आहे. यासाठी शेकापने आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवले आहे.

शेकापने नेहमीच व्यवस्थित नियोजन करूनच आतापर्यंत निवडणुका लढल्या आहेत आणि त्या जिंकल्यादेखील आहेत. त्यांच्या राजकीय रणनीतीचा सर्वच राजकीय पक्षांना चांगलाच अनुभव आहे. आघाडीचे उमेदवार तटकरे यांना निवडून आणण्यासाठी शेकापचे सुप्रिमो आमदार जयंत पाटील यांनी चंग बांधला आहे. यासाठी प्रचाराच्या सर्वच बाबींवर त्यांचे बारीक लक्ष आहे. शेतकरी भवनमधून ते रोजच्यारोज प्रचाराचा आढावा घेत आहेत. त्याचप्रमाणे प्रचाराचे नियोजनही केले जात आहे. बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांपासून ते आपले कुटुंब आणि स्वत:साठी त्यांनी कामाची जबाबदारी वाटून घेतली आहे. आमदार असलेले त्यांचे बंधू सुभाष पाटील हे सपत्नीक खारेपाटातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंच, सदस्य आणि पदाधिकारी यांच्या भेटी घेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील (भाचा), चित्रा पाटील, चित्रलेखा पाटील (सून), जयंत पाटील यांच्या पत्नी सुप्रिया पाटील, मुलगा नृपाल पाटील, मेहुणा प्रशांत नाईक हे कुटुंबातील तर, आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्या नीलिमा पाटील यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, गुहागर आणि दापोली या सहा विधानसभा मतदार संघात तटकरे यांना निवडून आणण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत आहे.विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्नराष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी आघाडी झाली आहे. आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू आहे.- प्रमोद घोसाळकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतटकरेंना निवडून आणणे काळाची गरजसर्वांगीण विकास साधण्यासाठी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आणणे काळाची गरज आहे. जातीय शक्तींना रोखण्यासाठीच तटकरेंना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.- आमदार सुभाष पाटील, शेकाप

टॅग्स :raigad-pcरायगड