शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णांच्या संख्येत वाढ; वृद्धांची संख्याही लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 00:00 IST

रायगडमध्ये तीन वर्षांत स्किझोफ्रेनियाचे दोन हजार २९७ रुग्ण

निखिल म्हात्रे अलिबाग : नैराश्य आणि तुटत चाललेल्या संवादामुळे गेल्या तीन वर्षांपासून स्किझोफ्रेनियाचे दोन हजार २९७ रुग्ण उपचारासाठी रायगड जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील रुग्णांची संख्या सर्वात जास्त असल्याचे मनोरुग्ण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. या रुग्णांत वृद्धांची संख्याही लक्षणीय आहे.गेल्या काही वर्षांपासून यातील स्किझोफ्रेनिया या आजाराच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. १ एप्रिल, २०१७ ते ३१ मार्च, २०१८ या कालावधीत १ हजार ४४ रुग्णांनी, तर १ एप्रिल, २०१८ ते ३१ मार्च, २०१९ या कालावधीत १ हजार ६५ रुग्ण उपचारासाठी मनोरुग्णालयात आल्याची नोंद आहे, तर या वर्षी १ एप्रिल, २०१९ ते ३१ मे, २०१९ या कालावधीत १८८ एवढे रुग्ण आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गेल्या तीन वर्षा$ंत २ हजार २९७ इतके रुग्ण उपचारासाठी आले असून, यात पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे, तर रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. नैराश्य, अश्लील चित्रफिती पाहणे, तुटत चाललेले संवाद, यामुळे हे आजार बळावत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आजारातील केवळ २० टक्के रुग्ण पूर्णत: बरे होत असल्याचेही डॉक्टर म्हणाले.काय आहे स्किझोफ्रेनिया आजार? : स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून, मेंदूचा विकारही आहे. मेंदूमधील डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. जनुकांमधील बदल, तसेच गर्भवती महिलेला ताप अथवा कुपोषित असल्यास बाळाला हा स्किझोफ्रेनिया आजार होण्याची जास्त शक्यता असते. स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांना विचार, भावना आणि वागणूक यात दोष निर्माण होतो. या आजारामध्ये व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो आणि तो माणूस स्वत: भ्रामक आणि आभासी जगामध्ये जगायला लागतात. रुग्णाचा मनावरील ताबा सुटतो. आजाराच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर उपचार करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागामार्फत रुग्णांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रुग्णालयात तरुणांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. - डॉ. अमोल भुसारे, मानसोपचार तज्ज्ञ, रायगड जिल्हा रुग्णालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटल