शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत मदत न मिळाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:07 IST

प्रवीण दरेकरांचा सरकारला इशारा : श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानीची के ली पाहणी

बोर्ली पंचतन/ म्हसळा : रायगडमध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर विरोधी पक्ष आधी नुकसानग्रस्त भागामध्ये पोहोचतात, पण सरकार उशिरा पोहोचते ही शोकांतिका आहे. चक्रीवादळाने प्रचंड हानी केली आहे. शासनाने रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीसाठी ७५ कोटी, सिंधुदुर्गसाठी २५ कोटी मदत जाहीर केली. ही मदत म्हणजे कोकणची सरकारने थट्टा केली असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर शासनाने प्रत्येक घरामागे तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली पाहिजे, अशी मागणीदेखील दरेकर यांनी केली. येत्या दोन दिवसांत जर मदत पोहोचली नाही तर श्रीवर्धन तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंगळवारी श्रीवर्धन तालुक्यामध्ये चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्या वेळी ते बोलत होते. माझ्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणि शरद पवार यांना रायगड जिल्ह्याचा दौरा करावा लागला, असे वक्तव्य त्यांनी केले.

निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यामध्ये बागायती, घरांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंगळवारी श्रीवर्धनमध्ये आले होते या वेळी त्यांनी पत्रकाररांशी संवाद साधला. या वेळी भाजप प्रवक्ते माधव भंडारी, जिल्हा अध्यक्ष दक्षिण रायगड अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, तालुकाप्रमुख प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.चक्रीवादळानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी सरकारने कोकणासाठी पक्षातून मंत्रीगणांनी तत्काळ येणे गरजेचे होते; परंतु विरोधी पक्षातील आम्ही नुकसानग्रस्त भागात पहिले पोहोचलो, मग शासन आले. मुख्यमंत्र्यांनी कोकणाला रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीसाठी ७५ कोटी तर सिंधुदुर्गसाठी २५ कोटी एवढी तुटपुंजी मदत जाहीर केली, ही मदत म्हणजे कोकणची थट्टा आहे. त्या मदतीचा एक रुपयाही नुकसानग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Raigadरायगड