शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वादात

By admin | Updated: February 22, 2016 00:43 IST

आदर्श शिक्षक, आदर्श अधिपरिचारिका यांना पुरस्कार देताना जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस घेतली जाते, मात्र आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार देताना ती का घेतली नाही, असा प्रश्न

अलिबाग : आदर्श शिक्षक, आदर्श अधिपरिचारिका यांना पुरस्कार देताना जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस घेतली जाते, मात्र आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार देताना ती का घेतली नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद शामकांत भोकरे यांनी केला. २९ फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याचे कारण देण्याच्या सूचना भोकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.निष्क्रिय ग्रामसेवकांना पुरस्कार देण्यात आल्याचा आरोप भोकरे यांनी केल्याने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याचे दिसून येते. भोकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेमध्ये पक्ष प्रतोद आहेत, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे हेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत, असे असताना भोकरे यांनी या पुरस्कारांवर आक्षेप घेतल्याने जिल्हा परिषदेच्या नेतृत्वालाच आव्हान दिल्याचे त्या निमित्ताने समोर आले आहे. जिल्ह्यातील ७५ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अलिबाग-कुरुळ येथील माळी समाज सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे होते. गेल्या पाच वर्षात ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. मागील पाच वर्षाचा अनुशेष भरुन काढीत जिल्हा परिषदेने तब्बल ७५ ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्याचे काम जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी करावे, असे आवाहन शेकापचे आमदार सुभाष पाटील यांनी केले. ग्रामीण भागात काम करणाऱ्या ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकार विकास योजनांसाठी निधी देत नाही. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे व्यापार धार्जिणे आहे. (प्रतिनिधी)आमदार सुभाष पाटील यांनी केली टीकाकेंद्र सरकार विकास योजनांसाठी निधी देत नाही. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे व्यापार धार्जिणे आहे. मेक इन इंडियाच्या नावाने सरकार देशातील जनतेची फसवणूक करीत असल्याची घणाघाती टीका आमदार पाटील यांनी केली. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, शिक्षण सभापती भाई पाशिलकर, अर्थ सभापती चित्रा पाटील, समाज कल्याण सभापती गीता जाधव, महिला, बालकल्याण सभापती प्रिया मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते.