शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयात आज होणार आक्षेपावर सुनावणी

By admin | Updated: November 14, 2016 04:24 IST

अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांविरोधातील आक्षेपावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांविरोधातील आक्षेपावर सोमवारी सुनावणी होणार आहे. सुनावणीमध्ये नेमके काय होणार या विवंचनेत आघाडी आणि संघर्ष समिती अडकल्याने निवडणुकीतील रणधुमाळीला अद्याप पाहिजे तशी रंगत आलेली नाही.शेकाप सत्ताधारी पक्षाविरोधात सर्व पक्षीय एकवटले आहेत. काँग्रेस आणि भाजपाने एकत्र येत त्यांच्या विरोधात संघर्ष समिती स्थापन करून निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे, तर शिवसेनेनेही आपले उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहेत. अलिबागमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहेत. शेकापचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत नाईक हे ठेकेदार असल्याचा ठपका संघर्ष समितीतील काँग्रेस आणि भाजपाने ठेवला आहे. नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देत त्यांच्याविरोधात अलिबागच्या जिल्हा न्यायालयात आक्षेप घेत दाद मागण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शेकापचे उमेदवार अनिल चोपडा यांच्या उमेदवारीलाही याच मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.जिल्ह्यातील अन्य आठ नगरपालिकेतील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. मात्र, अलिबागच्या बाबतीमधील प्रकरण न्यायालयात सुरू असल्याने तेथील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलेली नाहीत. न्यायालयातील प्रकरणावर सोमवारी सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे अलिबाग शहरामध्ये प्रचाराचा धुरळा अद्याप उडताना दिसून येत नाही. शेकापसह काँग्रेस, भाजपा, शिवसेनेने प्रचाराला काही प्रमाणात सुरुवात केली असली, तरी प्रचारात अद्याप रंगत आलेली नाही. दरम्यान, चिन्ह वाटप झालेले नसतानाही शेकापने कपबशी चिन्हासह उमेदवारांच्या प्रचाराचे बॅनर ठिकठिकाणी लावल्याचे दिसून आले.