शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

By admin | Updated: October 14, 2016 06:48 IST

तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीची ग्रामसभा पुन्हा तहकूब करण्यात आल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाला चक्क टाळे ठोकले. गांधी जयंती दिनी तहकूब झालेली ग्रामसभा गुरुवारी

अलिबाग : तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीची ग्रामसभा पुन्हा तहकूब करण्यात आल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाला चक्क टाळे ठोकले. गांधी जयंती दिनी तहकूब झालेली ग्रामसभा गुरुवारी होणार होती मात्र ग्रामसेवक हजर नसल्याचे कारण देत सरपंचांनी ग्रामसभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून कुर्डूस ग्रामपंचायतीची ओळख आहे. गावाच्या विकासासह विविध विषयांवरील चर्चेसाठी दरवर्षी किमान चार आणि कमाल सहा ग्रामसभा घेतल्या जातात. लोकशाहीचे बलस्थान हे ग्रामसभा असल्याचे मानले जाते. परंतु निम्म्या ग्रामसभा वेगवेगळी कारणे देऊन सत्ताधारी रद्द करीत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. ग्रामसभा रद्द होत असल्याने लोकांना त्यांचे प्रश्नच मांडण्याची संधी मिळत नसल्याचे ग्रामस्थ अनंत सोमा पाटील यांचे म्हणणे आहे.ग्रामस्थांच्या प्रश्नांसंदर्भात ग्रामपंचायत निर्णयच घेणार नसेल तर ग्रामपंचायतीची गरजच काय आहे, असा सवाल ग्रामसभेसाठी उपस्थित असलेल्या महिलांनी सरपंचांना विचारला. सुमारे १०० ग्रामस्थांची उपस्थिती असताना ग्रामसेवक नसल्याचे कारणे देऊन कुर्डूस ग्रामपंचायतीने मनमानी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जबाबदार असलेल्या ग्रामपंचायतीची चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत पिंगळे, विजय म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, नथुराम म्हात्रे, दीपक पाटील, रवींद्र म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे, मोहन पिंगळे आदी ग्रामस्थांनी केली. चौकशी न झाल्यास गावातील जागरूक व प्रतिष्ठित नागरिकांचे एक शिष्टमंडळ रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करावी, अन्यथा ग्रामपंचायतीचे कामकाज अनिश्चित काळासाठी बंद राहील, असे लेखी निवेदन कुर्डूसच्या सरपंचांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे. (प्रतिनिधी)