शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल आज कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर

By admin | Updated: March 17, 2016 02:26 IST

राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे १७ मार्चला कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील आदिवासी लोकांना त्यांची वहिवाट असलेल्या दळी जमिनीचे

कर्जत : राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे १७ मार्चला कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील आदिवासी लोकांना त्यांची वहिवाट असलेल्या दळी जमिनीचे वाटप करण्यासाठी ते कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये आयोजित कार्यक्र माला उपस्थित राहणार आहेत.अनेक पिढ्या वहिवाट असलेल्या दळी जमिनीचे मालक व्हावे यासाठी आदिवासी लोकांचा अनेक वर्षे लढा सुरु होता. राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर विद्यासागर राव यांनी आदिवासी समाजाच्या दळी जमिनीचा विषय प्राधान्याने लक्ष देवून त्यांना त्या जमिनीचे मालक होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील ५३ आदिवासी वाडीतील ७६१ दळी जमिनीवर राहत असलेल्या दळीधारकाला १०५३ हेक्टर जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप केले जाणार आहे. खालापूर तालुक्यातील ५७ आदिवासी वाडीमधील ३५१ दळीधारकांना तब्बल १०८७ हेक्टर जमिनीच्या पटट््यांचे वाटप राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते केले जाणार आहे. तालुक्यातील भालिवडी येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये आयोजित कार्यक्र मासाठी राज्यपाल १७ मार्चला सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने भिवपुरी येथील टाटा कंपनीच्या हेलिपॅडवर उतरतील. तेथून ११.२० वाजता मुख्य कार्यक्र म स्थळी पोहचणार असून १२.३० वाजता मुंबईला रवाना होणार आहेत. या कार्यक्र माला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, स्थानिक आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, राज्यपालांच्या कार्यालयाचे उपसचिव परिमल सिंग आदींची उपस्थिती असणार आहे.