शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना रोजगार मिळवून देणार

By admin | Updated: August 22, 2015 21:44 IST

कोकणातील जनतेने मला सहा वेळा खासदार म्हणून निवडून दिले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सहा वेळा निवडून येणारा मी एकमेव खासदार आहे. पुढील येणाऱ्या दोन पिढ्या माझी आठवण

नांदगाव : कोकणातील जनतेने मला सहा वेळा खासदार म्हणून निवडून दिले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सहा वेळा निवडून येणारा मी एकमेव खासदार आहे. पुढील येणाऱ्या दोन पिढ्या माझी आठवण ठेवतील, असे कार्य मला करावयाचे आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत माझ्या खात्यामार्फत एक - एक उद्योग प्रस्थापित करून किमान दहा हजार तरुणांना नोकरी मिळेल याकडे मी विशेष लक्ष देणार आहे. कोकणात जास्तीत जास्त उद्योग आणून येथील रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिले आहे.मुरुड नगरपरिषदेच्या मार्फत केंद्रीय मंत्री गीते यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत मिसाळ, उपजिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सुरेश पाटील, बांधकाम सभापती संजय गुंजाळ, माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील, गटनेते महेश भगत, तहसीलदार संदीप पानमंद, मुख्याधिकारी वंदना गुळवे, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद भायदे व सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गीते म्हणाले की, मुरुड नगरपरिषदेमार्फत विविध विकासकामासाठी ३३ कोटी ७० लाखांच्या कामासाठी माझ्याकडे निवेदन दिले आहे. यातील बहुतांशी कामे पूर्ण झालेली असतील, असे चित्र काही दिवसात पाहावयास मिळेल. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पर्यटन महोत्सवासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री यांना आमंत्रित केले जावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. मुरुड तालुक्याला सीआरझेडचा प्रश्न सतावत आहे. सीआरझेडबाबत केंद्रीय पर्यावरण खात्याने काही नियम शिथिल केले आहेत, परंतु त्याबाबतचे परिपत्रक निघालेले नाही. मुरुड येथील पद्मदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी खुला व्हावा यासाठी पर्यावरण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. कोकणातील सागरी किनाऱ्यावर मूलभूत सुविधा पर्यटकांना मिळण्यासाठी एमटीडीसी व आयपीडीसी यांचे सुध्दा सहकार्य होणार असून नैसर्गिक वैभव वाढवून पर्यटकांचे लोंढे वाढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.