शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागेत ‘मार्इंड डायव्हर्टचा गेम’

By admin | Updated: November 15, 2016 04:52 IST

सत्ताधारी शेकापला शह देण्यासाठी अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुकीत विरोधकांकडून मार्इंड डायव्हर्टचा गेम खेळला जात असल्याचे दिसते.

अलिबाग : सत्ताधारी शेकापला शह देण्यासाठी अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुकीत विरोधकांकडून मार्इंड डायव्हर्टचा गेम खेळला जात असल्याचे दिसते. शेकापला न्यायालयीन लढाईत गुंतवून ठेवत प्रचारात आघाडी घेऊन नगर पालिकेची सत्ता काबीज करण्याचे मनसुबे विरोधकांनी आखल्याचे पहायला मिळते. परंतु या मार्इंड डायव्हर्टच्या खेळीमुळे दोघांचाही वेळ खर्च होत असल्याने प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुकीतील शेकापच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराविरोधातील आक्षेपावरील सुनावणी सोमवारी टळली. त्यामुळे शेकापचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत नाईक यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल चोपडा यांची धाकधूक वाढली आहे. विरोधकांसाठी या प्रकरणातील निर्णय अतिमहत्वाचा असल्याने त्यांच्याही तोंडचे पाणी पळाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेकापला आव्हान देण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा यांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन केली. काँग्रेस, भाजपाला साथ देण्यासाठी आधी शिवसेनाही त्यांच्यात सामील होणार होती, मात्र काही कारणांनी शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामुळे संघर्ष समितीची काही प्रमाणात ताकद कमी झाल्याची धारणा मतदारांमध्ये झाली. शेकापला सहजासहजी विजय मिळवून द्यायचा नाही असा चंगच जणू विरोधकांनी बांधला आहे. यासाठीच त्यांनी सर्वप्रथम नाईक आणि चोपडा यांच्या उमेदवारीवर अर्जाच्या छाननीवेळी आक्षेप घेतला होता. तेथे त्यांच्याविरोधात कौल गेला. त्यामुळे विरोधकांनी थेट जिल्हा न्यायालयात धाव घेत याबाबत दाद मागितली. या सर्व न्यायालयीन लढ्यात विरोधकांनी शेकापला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत असले, तरी दुसऱ्या बाजूला विरोधकही गुंतून राहिल्याचे दिसते. मार्इंड डायर्व्हटचा फॉर्म्युला विरोधकांनी खेळला असला, तरी ते सुध्दा त्यात अडकल्याचे चित्र आहे. निवडणुकीला कमी कालावधी राहिलेला आहे. दोघांनाही प्रचारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आतापर्यंत प्रचाराला मोठ्या प्रमाणात रंगत यायला हवी होती ती अद्यापही आलेली नसल्याचे दिसून येते. विरोधकांनी प्रकरण न्यायालयात नेले असले, तरी निर्णय आमच्याच बाजूने लागणार याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे शेकापचे प्रदीप नाईक यांनी सांगितले.