शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

खैराच्या अवैध वाहतुकीवर वन विभागाची कारवाई

By admin | Updated: February 17, 2017 02:16 IST

महाड तालुक्यात सुरू असलेली बेकायदा जंगलतोड अवैध कोळसा व लाकूड वाहतुकीबाबत वनविभागाने गंभीर दखल घेतली

महाड : महाड तालुक्यात सुरू असलेली बेकायदा जंगलतोड अवैध कोळसा व लाकूड वाहतुकीबाबत वनविभागाने गंभीर दखल घेतली असून, गुरुवारी सकाळी वडघर येथे खैराची अवैध वाहतूक करणारे वाहन वनक्षेत्रपालांनी अडवून कारवाई केली. वनक्षेत्रपाल के. वाय. पाथरवट, वनपाल एस. सी. गुजर, ए. बी. झावरे यांनी ही कारवाई केली.बेकायदा जंगलतोड खैराची वाहतूक, तसेच कोळसा उत्पादन करणाऱ्या जंगलतस्कारांनी महाड तालुक्यात अक्षरश: उच्छाद मांडला आहे. याबाबत वनविभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नव्हती. महाड-रायगड मार्गावर वनविभागाचे कर्मचारी गस्त घालताना कोहर गावाजवळ तीन हजार रुपयांचा अवैध कोळसासाठा जप्त केला. तर भावे किये मार्गावर जंगलतोड केलेला मोठा साठा या पथकाने जप्त केला, तर बुुधवारी कोथुर्डे रस्त्यालगतही चार हजार रुपये किमतीचा कोळशाचा साठा गस्त पथकाने जप्त करून जीपही जप्त केली. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे महाड तालुक्यात अवैध जंगलतोड करून कोळसा उत्पादन करणाऱ्यांचे तसेच बेकायदा लाकडाची वाहतूक क रणाऱ्या जंगलतस्करांचे धाबे दणाणले आहेत. या बेसुमार जंगलतोडीमुळे तालुक्यातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून जंगलतस्करांसाठी वनविभागाचे अधिकारी यांचे अंतर्गत साटेलोटे असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्याचे साहस वनविभागाकडून होत नव्हते. मात्र, या अवैध जंगलतोडीबाबत पर्यावरणप्रेमींनी वरिष्ठ वन अधिकाऱ्याकडे तक्र ारी केल्यानंतर मात्र महाड वनविभाग कार्यालय जागे झाले असून त्यांनी हा कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)