शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करा

By admin | Updated: November 14, 2016 04:25 IST

विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढत्या ध्वन्ािप्रदूषणाचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार आणि ध्वनी नियमन व नियंत्रण नियमातील तरतुदीप्रमाणे

पोलादपूर : विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढत्या ध्वन्ािप्रदूषणाचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार आणि ध्वनी नियमन व नियंत्रण नियमातील तरतुदीप्रमाणे आवाजाची मर्यादा शासनाने अटी व शर्तीनुसार ठरवून दिली असून याबाबत काटेकोर पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन कैद व दंडाची शिक्षा होऊ शकते. यासाठी जनतेने नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलादपूर पोलिसांनी केले आहे.शांतता झोन दिवसा ५० डेसिबल मर्यादा तर रात्री १० नंतर ४० डेसिबल मर्यादा असून निवास झोन दिवसा ५५ रात्री ४५ डेसिबल, वाणिज्य झोनसाठी ६० डेसिबल, तर रात्री ५५ डेसिबल आणि औद्योगिक झोनसाठी ७५ डेसिबल व रात्री १० नंतर ७० डेसिबल अशी आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली असून येणारे प्रत्येक सण, खासगी, सार्वजनिक कार्यक्रम ३१ डिसेंबर या दिवशी होणारे कार्यक्रम अशासाठी शासनाने ठरवून दिलेल्या वरीलप्रमाणे मर्यादांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करून जर मर्यादांचे व कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून ५ वर्षे कैदेची सजा व १ लाख रुपये दंडापर्यंत शिक्षा होऊ शकते. जर ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार असल्यास पोलादपूर पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्ष रायगड-अलिबाग ०२१४१-२२२१०० या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलादपूर पोलिसांनी जनतेला केले आहे. या वेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र जगदाळे, उपनिरीक्षक अनिल अंधेरे, पो. ह. नाना म्हात्रे, सावंत, पाटील, अमित सावंत, गायकवाड आदी पोलीस कर्मचारी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)