दासगाव : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वीर गावच्या हद्दीत रविवारी सकाळी दोन वेगवेगळे अपघात झाले. यामध्ये सुमो - जीप - ट्रक व कारचा समावेश आहे. इरटीका कारमधील ५ जण जखमी झाले, तर सुमो व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास वारे गावच्या हद्दीत एका इरटीका कारच्या चालकाचा गाडीवरुन ताबा सुटला व कार क्रमांक एमएच ०६ बीई ८४० रस्त्याकडेला घसरली. यामधील सुरेश महाडिक (महाड), सुषमा सिंग, व्ही. टी. सिंग, आकाश सिंग, आर. के. सिंग असे पाच प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर महाड शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ वा. च्या सुमारास त्याच हद्दीत एक ट्रक क्रमांक एमएच ०४ ईबी ६३१४ व सुमो क्रमांक एमएच ०४ ईएस १३९८ यांच्यात समोरासमोर टक्कर झाली मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नसून दोन्ही वाहनांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सर्व जखमी महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या राहत असून त्यातील काही महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात अधिकारी आहेत. (वार्ताहर)
दोन वेगवेगळ्या अपघातांत पाच जखमी
By admin | Updated: June 6, 2016 01:36 IST